50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

Poco M4 Pro 5G जागतिक स्तरावर लॉन्च झाला आहे. हा मोबाईल फोन Poco M3 Pro 5G चा अपग्रेड व्हर्जन आहे, जो या वर्षाच्या सुरुवातीला सादर करण्यात आला होता, जो भारतात सादर करण्यात आला आहे.

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास
Poco M4 Pro 5g

मुंबई : Poco M4 Pro 5G जागतिक स्तरावर लॉन्च झाला आहे. हा मोबाईल फोन Poco M3 Pro 5G चा अपग्रेड व्हर्जन आहे, जो या वर्षाच्या सुरुवातीला सादर करण्यात आला होता, जो भारतात सादर करण्यात आला आहे. Poco M4 Pro 5G स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च केला जाईल याची माहिती देण्यात आलेली नाही, मात्र तो लवकरच दाखल होऊ शकतो. Poco M4 Pro 5G च्या मुख्य स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यात मीडियाटेक डायमेंशन 810 चिपसेट आणि बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. (Poco M4 Pro 5G Smartphone launched With 50MP Camera And Attractive Design)

जसे की, लॉन्च होण्यापूर्वीच सांगितले होते की Poco M4 Pro 5G मोबाइल Redmi Note 11 5G चं रीब्रँडेड व्हर्जन असेल. Poco च्या या फोनचं डिझाईन रेडमी सारखंच आहे. याशिवाय Poco F3 स्मार्टफोनही लॉन्च करण्यात आला आहे. चला तर मग Poco M4 Pro 5G ची किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन बद्दल जाणून घेऊया.

Poco M4 Pro 5G किंमत

Poco M4 Pro 5G ची किंमत 229 युरो (जवळपास 19,648 रुपये) आहे, ज्यात 4 GB रॅम आणि 64 GB इंटर्नल स्टोरेज मिळेल. त्याच वेळी, युजर्सना 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसाठी 249 युरो (21,364 रुपये) खर्च करावे लागतील. हा स्मार्टफोन पॉवर ब्लॅक, कूल ब्लू आणि पोको यलो कलरमध्ये आला आहे.

Poco M4 Pro 5G ची वैशिष्ट्ये

या Poco स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90hz आहे. तसेच, या फोनला 240hz चा टच सॅम्पलिंग रेट मिळेल. या फोनमध्ये MediaTek Dimension 810 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याला Mali G57 MC2 GPU देण्यात आला आहे. तसेच, यात 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळते. या स्मार्टफोनमध्ये 1 TB पर्यंतचे SD कार्ड इन्सर्ट करता येईल. हा स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 12.5 कस्टम स्किनवर काम करेल.

Poco M4 Pro 5G चा कॅमेरा सेटअप

Poco M4 Pro 5G च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, यात 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आहे. यासोबतच कंपनीने पोको ब्रँडिंगही केले आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सिस्टम देण्यात आली आहे.

इतर बातम्या

सार्वजनिक वायफाय वापरताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; तुमचे खाते होऊ शकते हॅक

नेटफ्लिक्स आयफोन यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर सादर करणार गेमिंग अॅप, जाणून घ्या काय आहे कारण

Kamal Haasan: कमल हसन लाँच करणार एनएफटी कलेक्शन, मेटाव्हर्सच्या विश्वातील पहिले भारतीय सेलिब्रिटी

(Poco M4 Pro 5G Smartphone launched With 50MP Camera And Attractive Design)

Published On - 12:48 pm, Wed, 10 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI