Kamal Haasan: कमल हसन लाँच करणार एनएफटी कलेक्शन, मेटाव्हर्सच्या विश्वातील पहिले भारतीय सेलिब्रिटी

Non-Fungible Token | कमल हसन यांनी एनएफटी कलेक्शन लाँच करण्यासाठी फँटिको या कंपनीशी करार केला आहे. मेटाव्हर्स हे एक आभासी जग आहे. या माध्यमातून कमल हसन यांच्या चाहत्यांना त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. तसेच आपल्या चाहत्यांना पोस्टर्स, अवतार आणि चित्रपटांच्या माध्यमातून हे एनएफटी उपलब्ध होतील.

Kamal Haasan: कमल हसन लाँच करणार एनएफटी कलेक्शन, मेटाव्हर्सच्या विश्वातील पहिले भारतीय सेलिब्रिटी
कमल हसन

नवी दिल्ली: दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी डिजिटल विश्वात सध्या प्रचंड चर्चा सुरु असलेल्या मेटाव्हर्सच्या मायाजालात पाऊल ठेवले आहे. मेटाव्हर्समध्ये डिजिटल अवतार असणारे कमल हसन हे भारतातील पहिले सेलिब्रिटी ठरणार आहेत. तसेच कमल हसन यांच्याकडून लवकरच एनएफटी (नॉन फंजिबल टोकन्स) कलेक्शन लाँच करण्यात येणार आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन आणि सनी लिओनी भारतीय सेलिब्रिटींनी एनएफटी कलेक्शन लाँच केले होते. कमल हसन यांनीही हाच कित्ता गिरवल्याने भारतीय सेलिब्रटींची एनएफटीविषयीची वाढते आकर्षण दिसून आले आहे.

कमल हसन यांनी 7 नोव्हेंबरला त्यांच्या वाढदिवसाच्यावेळी याबाबत जाहीर वाच्यता केली. भौतिक जग आणि डिजिटल विश्वातील मध्यबिंदू असणाऱ्या मेटाव्हर्सच्या जगात भ्रमंती करण्यासाठी मी उत्सुक आहे. सहा दशकांमधील माझे वैयक्तिक आणि व्यावसायिक कारकीर्द ही मी मेटाव्हर्ससाठी दिलेली देणगी असल्याचे त्यांनी म्हटले.

याशिवाय, कमल हसन यांनी एनएफटी कलेक्शन लाँच करण्यासाठी फँटिको या कंपनीशी करार केला आहे. मेटाव्हर्स हे एक आभासी जग आहे. या माध्यमातून कमल हसन यांच्या चाहत्यांना त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. तसेच आपल्या चाहत्यांना पोस्टर्स, अवतार आणि चित्रपटांच्या माध्यमातून हे एनएफटी उपलब्ध होतील. मेटाव्हर्समध्ये कमल हसन यांचे स्वत:चे संग्रहालयही असेल. फँटिको या कंपनीकडून आगामी काळात भारतातील आणखी सेलिब्रिटी, खेळाडू आणि प्रसिद्ध व्यक्तींना मेटाव्हर्सच्या विश्वाशी जोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एखाद्या युजरने विशिष्ट किंमतीचा एनएफटी विकत घेतल्यास संबंधित व्यक्तीच्या एनएफटी कलेक्शनमधून एक अश्युअर्ड कलावस्तू मिळते.

एनएफटी म्हणजे काय?

नॉन फंजिबल टोकन( NFT) ही एक डिजिटल मालमत्ता आहे. एनएफटी वास्तव जगातील एखाद्या गोष्टीचे आभासी जगात प्रतिनिधित्व करते. ही खरी वस्तू संगीत, कला, खेळणी, गेम, व्हिडिओ किंवा सोशल मीडिया पोस्ट इत्यादी विविध वस्तूंचे डिजिटल स्वरुपात प्रतिनिधित्व करणारी ही मालमत्ता किंवा टोकन असते. मात्र याच्या नावात असल्याप्रमाणे म्हणजे हे नॉन फंजिबल टोकन असल्यामुळे याची इतर वस्तूशी अदलाबदल होऊ शकत नाही. अलीकडच्या काळात एनएफटी हे कलेशी निगडीत वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीसाठी लोकप्रिय झाले आहेत.

15 वर्षापूर्वीचं ट्विट विक्रीला; 2 कोटी रुपये किंमत

ट्विटरचे सीईओ अब्जाधीश जॅक डोरसी हे त्यांचं 15 वर्षापूर्वीचं ट्विट विक्रीला काढलं होतं. त्यांचं हे सर्वात पहिलं ट्विट असून विशेष म्हणजे या ट्विटला 2 कोटी रुपयांची बोली लागली होती. 6 मार्च 2006 रोजी म्हणजे बरोबर 15 वर्षांपूर्वी त्यांनी हे ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी, ‘जस्ट सेटिंग अप माय ट्विटर’, असं लिहिलं होतं. एवढ्या मोठ्या किंमतीला विकलं जाणारं जगातील हे पहिलंच ट्विट असल्याचं सांगण्यात येत आहे. 15 वर्षानंतर डोरसी यांनी त्यांचं ट्विट क्रिप्टोकरन्सी म्हणून विकण्याची घोषणा केली होती. त्यानंतर डोरसी यांच्या ट्विटला बोलीही लागली होती. डोरसे यांनी एनएफटी (नॉन-फंजिबल टोकन)साठी एका बिडिंग लिंकसोबत व्हॅल्यूएबल्स नावाच्या एका प्लॅटफॉर्मवरून ट्विट केलं होतं. एनएफटी अथेरियम ब्लॉकचेनवरील एक डिजिटल टोकन आहे.

NFTद्वारे डिजीटल आयटमची विक्री

एनएफटीद्वारे डिजीटल आयटम्सची खरेदी-विक्री करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच ब्लॉकचेनचा वापर करणाऱ्या लोकांची नोंदही ठेवली जातं.

संबंधित बातम्या:

फेस रिकग्निशन सिस्टिमचा वापर सुरुच ठेवणार; Meta च्या प्रवक्त्यांची माहिती

15 वर्षापूर्वीचं ट्विट विक्रीला; 2 कोटी रुपये किंमत; वाचा नेमकं प्रकरण काय?

Published On - 1:11 pm, Mon, 8 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI