AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेस रिकग्निशन सिस्टिमचा वापर सुरुच ठेवणार; Meta च्या प्रवक्त्यांची माहिती

या आठवड्याच्या सुरुवातीला फेसबुकने घोषणा केली होती की त्यांची कंपनी फेस रिकग्निशन सिस्टम (Face Recognition System) बंद करत आहेत. परंतु आता, सोशल नेटवर्कची मूळ कंपनी मेटाने सांगितले की, ते आपल्या मेटाव्हर्स प्रोडक्ट्ससाठी ही सिस्टम वापरणे सुरू ठेवणार आहेत.

फेस रिकग्निशन सिस्टिमचा वापर सुरुच ठेवणार; Meta च्या प्रवक्त्यांची माहिती
face recognition
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 05, 2021 | 3:36 PM
Share

मुंबई : या आठवड्याच्या सुरुवातीला फेसबुकने घोषणा केली होती की त्यांची कंपनी फेस रिकग्निशन सिस्टम (Face Recognition System) बंद करत आहेत. परंतु आता, सोशल नेटवर्कची मूळ कंपनी मेटाने सांगितले की, ते आपल्या मेटाव्हर्स प्रोडक्ट्ससाठी ही सिस्टम वापरणे सुरू ठेवणार आहेत. (Meta says we will continue to use the face recognition system)

Recode च्या अहवालानुसार, Meta आधीच त्यांच्या उदयोन्मुख Metaverse व्यवसायात बायोमेट्रिक्स समाविष्ट करण्याचे मार्ग शोधत आहेत, ज्याचा उद्देश व्हर्च्युअल, इंटरनेट-आधारित सिम्युलेशन तयार करणे आहे जेथे लोक अवतार म्हणून संवाद साधू शकतात. मेटा प्रवक्ते जेसन ग्रॉस यांनी रिकोडला सांगितले की “आमचा विश्वास आहे की, या तंत्रज्ञानामध्ये भविष्यातील सकारात्मक वापर सक्षम करण्याची क्षमता आहे जी गोपनीयता, नियंत्रण आणि पारदर्शकता राखते.”

फेसबुकची घोषणा

फेसबुक यापुढे तुम्ही अपलोड केलेले फोटो दुसऱ्या व्यक्तींसोबत ऑटो टॅग करणार नाही. फेसबुकने याची अधिकृत घोषणा केली आहे. खरं तर, फेसबुकवर स्वतःच्या फायद्यासाठी वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप सातत्याने होत आहे, त्यानंतर कंपनीने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. फेसबुकने म्हटले आहे की, ते फेस रिकग्निशन टेक्नोलॉजी बंद करणार आहेत आणि एक अब्जाहून अधिक लोकांच्या चेहऱ्याचे फेसप्रिंट त्यांच्या सर्व्हरमधून हटवणार आहेत.

गोपनीयतेच्या उल्लंघनाचे आरोप

जेव्हा तुम्ही Facebook वर दुसर्‍या व्यक्तीसोबत काढलेला फोटो अपलोड करता, तेव्हा Facebook त्या फोटोतील व्यक्तीला तुमच्यासोबत टॅग करतं. फेसबुक हे सर्व आपल्या फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीच्या (Face Detection Technology) मदतीने करत होतं. खरं तर, फेसबुक आपल्या वापरकर्त्यांचे फेस त्यांच्या सर्व्हरवर स्टोर करतं आणि याचा वापर करून, फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाच्या मदतीने, ते वापरकर्त्याच्या फोटोमध्ये उपस्थित लोकांचे फेस डिटेक्ट करुन त्यांना टॅग करतं. मात्र या तंत्रज्ञानावर गेल्या काही काळापासून गोपनीयतेच्या उल्लंघनाचे आरोप होत आहे. प्रायव्हसी उल्लंघनाच्या सुरू असलेल्या वादामुळे फेसबुकने येत्या आठवडाभरात ही टेक्नोलॉजी बंद करण्याची घोषणा केली आहे.

शेकडो कोटी फेस डिलीट करण्याचा निर्णय

फेसबुकने आपल्या सर्व्हरवर असलेले शेकडो कोटी फेस डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर, फेसबुकचे हे तंत्रज्ञान गोपनीयतेच्या मुद्द्यामुळे बऱ्याच काळापासून वादात होते, कारण यासाठी फेसबुक त्यांच्या सर्व्हरवर लाखो फेसेस स्टोर करत असे आणि बरेच लोक हे फेसबुक वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर हल्ला असल्याचे मानत होते. या तंत्रज्ञानामुळे फेडरल ट्रेड कमिशनने (Federal Trade Commission) 2019 मध्ये फेसबुकला 500 मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावला होता. त्याचवेळी, फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीमुळे, गेल्या वर्षी अमेरिकेतील इलिनोइस प्रांतात, फेसबुकने तक्रारकर्त्याला त्यांच्याविरुद्धच्या खटल्यात ‘फेस ज्यॉमेट्री’सह लोकांच्या बायोमेट्रिक माहितीच्या वापरावर तोडगा काढण्यासाठी 650 मिलियन डॉलर्स दिले होते.

फेसबुककडे युजर्सचा बायोमेट्रिक डेटा, युजर्सकडून विरोध

फेसबुकच्या या तंत्रज्ञानाला विरोध करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे युजर्सच्या गोपनीयतेचे उल्लंघन आणि युजर्सची बायोमेट्रिक माहिती फेसबुककडे असणे हे होते. मात्र, गेल्या महिन्यात फेसबुकचे माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेनने फेसबुकचे अंतर्गत दस्तावेज लीक केले होते, त्यानंतर फेसबुकला मोठा विरोध झाला होता. कंपनी युजर्सच्या गोपनीयतेचा वापर करून त्याचा फायदा घेत असल्याचा आरोप केला जात आहे. ही चूक सुधारण्यासाठी कंपनीने त्यांचे व्यावसायिक नावही बदलले होते.

इतर बातम्या

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

(Meta says we will continue to use the face recognition system)

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?