AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apple प्रेमींची निराशा, आता iPhone चे हे मॉडेल्स खरेदी करू शकणार नाहीत

एप्पलने तिची आयफोन सिरीज लॉंच केल्यानंतर चार आयफोनना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा तुमच्या आवडीचा फोन तर त्यात नाही ना ?

Apple प्रेमींची निराशा, आता iPhone चे हे मॉडेल्स खरेदी करू शकणार नाहीत
Apple-iPhoneImage Credit source: socialmedia
| Updated on: Sep 13, 2023 | 5:26 PM
Share

नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : Apple iPhone 15 Series लॉंच केल्यानंतर आता आयफोन बनविणाऱ्या Apple कंपनीने काही मॉडेल्सची निर्मिती थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे तुम्हाला या Apple कंपनीचे काही मॉडेल आता या कंपनीच्या शोरुममध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार नाहीत. जर तुम्हाला कंपनीचे आधीचे मॉडेल्स आता विक्रीसाठी उपलब्ध असणार नाहीत. त्यामुळे या मॉडेल्सच्या किंमती कमी होण्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडणार आहे. चला आपण पाहुयात कोण कोणत्या मॉडेल्सची विक्री एप्पल कंपनीने आता बंद केली आहे.

आयफोन 15 ची नविन मालिका लॉंच झाल्यानंतर एप्पल कंपनीने आता एप्पलचे iPhone 12, iPhone 13 mini तसेच iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची निर्मिती थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. आयफोन 14 प्रो मॅक्स गेल्यावर्षी लॉंच झालेल्या आयफोन 14 मालिकेतील सर्वात महागडा फोन होता. या फोनची किंमत 1 लाख 39 हजार 900 रुपयांपासून सुरु होत होती. आता या फोनला कंपनीने तिच्या अधिकृत वेबसाईटवरुन हटविले आहे.

तसेच आयफोन 14 प्रो चे देखील उत्पादन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. या फोनला गेल्या इव्हेंटवेळी 1 लाख 29 हजार 900 रुययांच्या किंमतीला उतरविले होते. आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस हे दोन फोन मात्र विक्रीसाठी पूर्वीप्रमाणे उपलब्ध असतील.

एप्पल कंपनीने छोट्या आकाराचा आयफोन 13 मिनी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या फोनला ज्या लोकांना मोठ्या फोन ऐवजी लहान फोनमध्ये फ्लॅगशिप फिचर्सचा आनंद घेऊ शकतात त्यांच्यासाठी हा फोन लॉंच करण्यात आला होता.

एप्पलने साल 2020 मध्ये लॉंच केलेल्या आयफोन 12 च्या मॉडेल देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या फोनच्या 128 जीबी स्टोअरेज मॉडेलला 59,900 रुपयांत बाजारात उतरविले होते.

आता देखील खरेदी करु शकता पण

एप्पलने या चार मॉडेल्सना आपल्या अधिकृत साईटवरुन जरी हटविले असले तरी तुम्हाला या मॉडेल्सना विकत घ्यायचे असेल तर ई – कॉमर्स साईट्सवर विकत घेऊ शकता. एमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाईटवरुन तुम्ही स्टॉक शिल्लक असेपर्यंतच तुमचे आवडते मॉडेल खरेदी करु शकता.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.