
आजच्या काळात स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे. फक्त संवादासाठी नव्हे, तर शॉपिंगपासून बँकिंगपर्यंत, फोटो काढण्यापासून कंटेंट तयार करण्यापर्यंत अनेक गरजा फोनवरच भागवल्या जातात. या सततच्या वापरामुळे बॅटरी लवकर संपते, आणि त्यामुळे मोठी बॅटरी असलेल्या फोनची मागणी झपाट्याने वाढली आहे.
विशेषतः जे वापरकर्ते गेमिंग, सोशल मिडिया, व्हिडीओ स्ट्रिमिंग यासाठी फोनचा जास्त वापर करतात, त्यांच्यासाठी मोठ्या बॅटरीचा स्मार्टफोन ही गरज बनली आहे. आता हीच सुविधा १५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये मिळतेय, आणि तीही नामांकित ब्रँड्सकडून.
चला तर पाहूया १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत येणारे पाच उत्कृष्ट स्मार्टफोन जे 6000mAh किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या बॅटरीसह येतात:
1. Samsung Galaxy M35 5G
सॅमसंगचा हा मॉडेल 6000mAh बॅटरीसह येतो आणि यात 5G कनेक्टिव्हिटीची सुविधाही आहे. या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले, चांगली कॅमेरा क्वालिटी आणि दीर्घकालीन बॅटरी बॅकअप असल्यामुळे तो गेमिंग आणि मल्टीमीडिया युजर्ससाठी उपयुक्त ठरतो.
2. vivo T4x 5G
विवो T4x 5G देखील 6000mAh क्षमतेच्या बॅटरीसह येतो. यामध्ये MediaTek चा प्रोसेसर, दमदार डिस्प्ले आणि स्लीक डिझाईन देण्यात आलं आहे. या फोनमध्ये AI-आधारित कॅमेरा फिचर्स देखील आहेत, जे याला यंग युजर्समध्ये लोकप्रिय करतात.
3. Motorola G64 5G
मोटोरोला या ब्रँडचा G64 5G हा मॉडेल 6000mAh पेक्षा मोठी बॅटरी, स्टॉक Android अनुभव आणि मजबूत बॉडीसह येतो. फास्ट चार्जिंग सपोर्टही यामध्ये दिला गेला आहे. हे मॉडेल त्याच्या क्लीन यूजर इंटरफेससाठी ओळखलं जातं.
4. Realme Narzo 80x 5G
रिअलमीचा Narzo 80x 5G मॉडेल गेमिंगसाठी उत्तम मानला जातो. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले, MediaTek प्रोसेसर आणि 5000mAh पेक्षा अधिक बॅटरी आहे. याचे कॅमेरेही सोशल मीडिया यूजर्सच्या गरजा पूर्ण करतात.
5. Redmi 10 Power
रेडमीचा हा बजेट फोन 6000mAh बॅटरीसह येतो. यात Qualcomm चा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, मोठा HD+ डिस्प्ले आणि दमदार बिल्ड क्वालिटी आहे. ज्यांना रोजच्या वापरासाठी विश्वासार्ह फोन हवा आहे, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
फोन विकत घेताना या ३ महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा
1. फोन घेताना सर्वप्रथम विचार करा की तुम्ही तो कोणत्या हेतूसाठी वापरणार आहात.
2. किमान 5000mAh क्षमतेची बॅटरी असणारा फोन घ्या, जेणे करून तो पूर्ण दिवस चालेल
3. फोन विकत घेण्याआधी ऑनलाइन रिव्ह्यूज वाचा आणि किमान १ वर्षाची वॉरंटी असलेला फोन घ्या.