Mahindra : सणासुदीच्या काळात Mahindra SUV महागणार, दुप्पटीने वाढणार कारचे भाव? जाणून कोणत्या वाहनांच्या वाढणार किमती
सणासुदीच्या काळात नवीन कार खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा महत्त्वाचा अपडेट आहे. Mahindraकडून पुढील काही आठवड्यांत दरवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

सणासुदीच्या काळात नवं वाहन हमखास खरेदी केलं जातं. याचं साधं कारण म्हणजे सणासुदीच्या काळात वाहनांवर, इलेक्ट्रिक वस्तूंवर भरगोस सूट मिळते. दिवाळी – दसरा तोंडावर आहेत त्यामुळे त्यामुळे अनेकांनी वाहन खरेदी करण्याची तयारी सुरू केलीच असणार. पण त्यातच महिंद्रा कंपनीने कारची किंमत वाढवल्याने सर्वसामान्यांना वाहन खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.
महिंद्रा ऑटोमोटिवचे प्रेसिंडट आणि CEO निलीकांत गोलगुंटा यांनी नुकतंच जाहीर केलं आहे की, कंपनी सध्या कमोडिटीवर नजर ठेवून आहे. वाढत्या कमोडिटीच्या किमतीनुसार त्यांना सुद्धा आपल्या वाहनाच्या किमतीत वाढ करावी लागणार आहे.
२०२६ या एका वर्षात ३ वेळा वाढली किंमत
२०२६ या एकाच वर्षात कंपनीने तब्बल तीन वेळा भाव वाढवले आहेत. जानेवारी, एप्रिल आणि जुलै महिन्यात महिंद्राच्या कारचे भाव गगनाला भिडले होते. जुलै महिन्यात महिन्द्राच्या किमतीने तर उच्चांक गाठला होता. जुलैमध्ये एसयूव्हीच्या किमती या सरासरी २.७ टक्क्यांनी वाढल्या . अधिकृत घोषणेमध्ये महिंद्राने म्हटले होते की १० जुलै २०२६ पासून एसयूव्हीसाठी सरासरी २.७ टक्के आणि व्यावसायिक वाहनांसाठी २ टक्के दरवाढ केली जाईल. कंपनीने या दरवाढीमधे वस्तूंच्या वाढत्या किमती हे मुख्य कारण असल्याचे सांगितले. तसेच वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरिएंटसाठी दरवाढीची रक्कम वेगवेगळी असू शकते. असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कोणत्या SUV गाड्या होणार महाग?
जर महिंद्राने वाहनांच्या किंमती वाढवल्या तर या वाहनांची किंमत वाढण्याची शक्यता आहे. Thar, Thar ROXX, Scorpio – N, Scorpio Classic, XUV 3XO, XUV700 आणि Bolero यासांरख्या मॉडेल्सची किंमत वाढण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप तरी वाहनांचे भाव घोषित केले नसले तरी किमतीसह वाहनाची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
