Facebook Meta update: फेसबुकवर एका अकाऊंटवरुन बनवता येतील 5 प्रोफाइल्स, जाणून घ्या डिटेल्स

| Updated on: Jul 16, 2022 | 8:04 AM

Facebook Meta update: 'मेटा'ने (Meta) फेसबुकसाठी (Facebook) एका मोठ्या फिचरची घोषणा केली आहे. या नव्या फिचरद्वारे युजर्सना एकाच फेसबुक अकाउंटवरुन जास्तीत जास्त पाच प्रोफाइल (Profile) बनवता येतील.

Facebook Meta update: फेसबुकवर एका अकाऊंटवरुन बनवता येतील 5 प्रोफाइल्स, जाणून घ्या डिटेल्स
facebook
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: ‘मेटा’ने (Meta) फेसबुकसाठी (Facebook) एका मोठ्या फिचरची घोषणा केली आहे. या नव्या फिचरद्वारे युजर्सना एकाच फेसबुक अकाउंटवरुन जास्तीत जास्त पाच प्रोफाइल (Profile) बनवता येतील. कंपनीला आपल्या प्लॅटफॉर्मवर युजर एंगेजमेंट वाढवायची आहे, त्यासाठी कंपनी हे नवीन फिचर घेऊन आली आहे. फेसबुकच्या या नव्या फिचरची सध्या टेस्टिंग सुरु आहे. रिपोर्ट्सनुसार, टेस्टिंग मध्ये सहभागी झालेल्या बीटा युजर्सना आपल्या एकाच अकाउंटवरुन 5 प्रोफाइल बनवण्याची सुविधा देण्यात आली आहे. एक्स्ट्रा प्रोफाइल मध्ये युजर्सना आपलं खरं नाव सांगण्याची सुद्धा गरज नाही. सोप्या शब्दात सांगायच झाल्यास, तुम्ही तुमची ओळख लपवून कुठल्याही पोस्टवर कमेंट करु शकता. मेटा काढत असलेल्या या नव्या फिचवरुन वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण यामुळे स्पॅम आणि Fake Profile मध्ये वाढ होईल.

नियमांच उल्लंघन केल्यास, मुख्य अकाऊंटलाही धोका

‘अतिरिक्त प्रोफाइल्सना फेसबुकची पॉलिसी मान्य करवी लागेल’, असं मेटाने सांगितलय. तुम्ही तुमच्या दुसऱ्या प्रोफाइलवरुन पॉलिसीच उल्लंघन केल्याच आढळून आल्यास, मेन अकाऊंटला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. अतिरिक्त प्रोफाइल्समुळे युजर्सना वेगळी ओळख मिळेल. त्याशिवाय वेगळ्या कॅटेगरीचे Feed मिळतील, असं मेटाने म्हटलं आहे. एखाद्या युजरला गेम आणि ट्रॅव्हल मध्ये रस असेल, तर त्याला या दोन कॅटगरीच्या हिशोबाने प्रोफाइल बनवता येईल. त्यानुसारच, तो लोकांना फॉलो करु शकेल.

Metaverse आणि Web3 साठी वॉलेट लॉन्च

मागच्याच महिन्यात मेटाने मेटावर्स आणि वेब 3 साठी आपलं वॉलेट लाँच केलं. मेटाच्या या पेमेंट सिस्टिमच नाव Meta Pay आहे. हा एक युनिव्हर्सल पेमेंट मोड आहे. याद्वारे मेटावर्स शिवाय साधारण पेमेंटही होऊ शकतात. Meta pay हे फेसबुक पे चं नव रुप आहे.

मेटा पे संदर्भात मेटाचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी आपल्या एका पोस्ट मध्ये म्हटलं होतं की, “Web 3 च्या स्वामित्वावरुन जगात एक मोठी लढाई सुरु आहे. ही लढाई महत्त्वपूर्ण सुद्धा आहे. येणाऱ्याकाळात युजर्स डिजिट कपडे घालायला सुरुवात करणार आहेत. मेटावर्स मध्ये शॉपिंगही केली जाईल. ज्यासाठी एका पेमेंट सिस्टिमची आवश्यकता भासेल”