खात्यातून दरमहा पैसे जातायत? AutoPay बंद करण्याचा हा आहे सोपा मार्ग !

अनेकदा जुन्या सब्सक्रिप्शनमुळे UPI AutoPay द्वारे बँक खात्यातून पैसे 'आपोआप' कट होतात. ही सोय रिचार्ज, बिल, EMI साठी उपयुक्त असली तरी, न वापरल्यास बंद करणे आवश्यक आहे. पण आता नो टेन्शन! हे ऑटो-डेबिट बंद करणं आहे अगदी सोपं! चला, पाहूया कसा वाचवायचा हा अनावश्यक खर्च!

खात्यातून दरमहा पैसे जातायत? AutoPay बंद करण्याचा हा आहे सोपा मार्ग !
| Edited By: | Updated on: Jun 23, 2025 | 10:34 PM

आजच्या डिजिटल युगात बऱ्याचशा सेवा, अ‍ॅप्स आणि वेबसाईट्स आपल्याकडून दरमहिन्याला AutoPay च्या माध्यमातून पैसे वसूल करत असतात. काही वेळा आपण अनावधानाने किंवा ऑफरच्या नादात एखाद्या अ‍ॅपला AutoPay परवानगी देतो आणि पुढे प्रत्येक महिन्याला बँक खात्यातून पैसे आपोआप वजा होत राहतात.

जर तुम्हीही यामुळे त्रस्त असाल आणि खात्यातून पैसे कोणत्या कारणाने कट होतात हे समजत नसेल, तर हा AutoPay बंद करण्याचा उपाय तुमच्यासाठी आहे.

UPI AutoPay म्हणजे काय आणि कशासाठी?

UPI AutoPay ही एक डिजिटल सोय आहे. यामुळे तुम्ही मोबाईल रिचार्ज, वीज बिल, OTT Platforms, विम्याचा हफ्ता, कर्जाचा EMI किंवा म्युच्युअल फंडाची SIP यांसारख्या नियमित पेमेंटसाठी एक ‘e-Mandate’ सेट करू शकता. एकदा हे सेट केलं की, ठरलेल्या तारखेला तुमच्या बँक खात्यातून आपोआप पैसे कापले जातात. यामुळे पेमेंट करायचा त्रास वाचतो आणि वेळेवर बिलं भरली जातात.

AutoPay चा ‘धोका’ आणि तो कसा टाळाल?

सोय चांगली असली तरी, अडचण तेव्हा येते जेव्हा तुम्ही ती विशिष्ट सर्व्हिस वापरणं बंद करता, पण AutoPay बंद करायला विसरता. मग नको असतानाही दर महिन्याला पैसे कट होत राहतात आणि आपल्याला आर्थिक फटका बसतो. पण काळजी करू नका! हा AutoPay बंद करणं खूप सोपं आहे आणि ते तुम्ही काही सेकंदात तुमच्या UPI ॲपमधून करू शकता.

AutoPay बंद करण्याची सोपी पद्धत:

तुम्ही जे UPI ॲप वापरता (उदा. PhonePe, Google Pay, Paytm, BHIM इत्यादी), ते तुमच्या स्मार्टफोनवर उघडा.

ॲपच्या मुख्य मेनूमध्ये किंवा तुमच्या प्रोफाइल सेक्शनमध्ये ‘Settings’ हा पर्याय शोधा.

सेटिंग्जमध्ये तुम्हाला ‘AutoPay’, ‘Mandates’, ‘My Mandates’, ‘UPI Mandates’ किंवा ‘Recurring Payments’ असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. ( प्रत्येक ॲपमध्ये याचं नाव थोडं वेगळं असू शकतं )

इथे तुम्हाला त्या सर्व सर्व्हिसेसची किंवा मँडेट्सची यादी दिसेल, ज्यासाठी तुमचं AutoPay सध्या Active आहे.

ज्या सर्व्हिससाठी AutoPay बंद करायचं आहे, त्या सर्व्हिसच्या नावावर किंवा मँडेटवर टॅप करा.

आता तुम्हाला ‘Cancel Mandate’, ‘Revoke AutoPay’, ‘Pause’ किंवा ‘Delete Mandate’ असा पर्याय दिसेल.

‘Cancel’ किंवा ‘Revoke’ निवडून आणि नंतर Confirm करून तुम्ही ते AutoPay कायमचं बंद करू शकता.

इतकं केल्यावर तुमचं त्या विशिष्ट सर्व्हिससाठीचं AutoPay बंद होईल आणि पुढच्या वेळेपासून त्यासाठी पैसे कट होणार नाहीत.