AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॅपटॉपवर WhatsApp वापरताय? ‘ही’ सिक्रेट ट्रिक तुमच्या पर्सनल चॅट्स ठेवेल सेफ!

लॅपटॉपवर व्हॉट्सॲप सुरू आणि आजूबाजूला लोकांची नजर तुमच्या पर्सनल चॅटवर... अवघडल्यासारखं होतं ना? मोबाईलसारखा चॅट लपवायचा थेट पर्याय वेबवर नाही. पण काळजी नको! एका साध्या क्रोम एक्सटेंशनने तुम्ही तुमच्या खासगी गप्पांना देऊ शकता एक 'अदृश्य' कवच! कसं? चला पाहूया!

लॅपटॉपवर WhatsApp वापरताय? 'ही' सिक्रेट ट्रिक तुमच्या पर्सनल चॅट्स ठेवेल सेफ!
| Edited By: | Updated on: Jun 23, 2025 | 10:26 PM
Share

आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सॲप हा केवळ एक मेसेजिंग अ‍ॅप राहिलेला नाही, तर तो आपल्या दैनंदिन संवादाचा अविभाज्य भाग बनला आहे. ऑफिसचे अपडेट्स, क्लायंट्ससोबतची चर्चा, वैयक्तिक चॅट्स आणि कुटुंबाशी संवाद हे सर्व व्हॉट्सॲपवरच चालतं. अनेकदा लॅपटॉपवर काम करत असताना आपण WhatsApp Web वापरत असतो. पण या वेळी आपल्या पर्सनल चॅट्स इतरांच्या नजरेस पडू नयेत, याची काळजी घ्यावी लागते.

लॅपटॉपवर WhatsApp वापरताना काय धोका असतो?

ऑफिसमधील सहकारी, बस किंवा ट्रेनमध्ये शेजारी बसलेले प्रवासी किंवा अगदी घरीसुद्धा कधीमधी दुसऱ्याची नजर तुमच्या स्क्रीनवर पडू शकते. मोबाईल ॲपमध्ये चॅट लॉक किंवा हिडन चॅट्ससारखे पर्याय असले तरी, WhatsApp Web वर अशी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ‘प्रायव्हसी’ ही एक मोठी अडचण ठरते.

मग उपाय काय?

जवळजवळ प्रत्येकाच्या वापरात असणाऱ्या Google Chrome ब्राउझरमध्ये एक अशा समस्येवर मात करणारे साधं पण प्रभावी एक्सटेंशन उपलब्ध आहे “Privacy Extension for WhatsApp Web”.

कसं वापराल हे एक्सटेंशन?

इंस्टॉल करा: गुगल क्रोम स्टोअरवरून “Privacy Extension for WhatsApp Web” हे एक्सटेंशन तुमच्या ब्राउझरमध्ये Add करा.

सेटिंग्ज बदला: एक्सटेंशन इंस्टॉल झाल्यावर, क्रोमच्या उजव्या कोपऱ्यातील एक्सटेंशन आयकॉनवर क्लिक करून या एक्सटेंशनच्या सेटिंग्जमध्ये जा.

काय लपवायचंय ते निवडा: इथे तुम्हाला अनेक Options मिळतील. तुम्ही तुमचे मेसेजेस, चॅटमधील व्यक्तींची नावं, प्रोफाईल फोटो, किंवा अगदी संपूर्ण चॅट लिस्टच Blur करू शकता. तुम्ही Mouse त्या भागावर नेल्यावरच तो स्पष्ट दिसेल, एरवी तो इतरांना अस्पष्ट दिसेल.

फायदे काय?

या एक्सटेंशनमुळे तुम्ही लॅपटॉपवर व्हॉट्सॲप वापरताना अधिक Secure आणि Relaxed राहू शकता. तुमची खासगी चॅट्स किंवा माहिती सहजपणे इतरांच्या नजरेस पडणार नाही. ऑफिसमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी लॅपटॉपवर काम करताना हे खूपच उपयोगी आहे. ही एक छोटीशी ट्रिक आहे, पण ती तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. व्हॉट्सॲप वेबवर तुमच्या चॅट्सना अतिरिक्त सुरक्षा कवच देण्यासाठी हा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.