Moto: 5G प्रोसेसरसह मोटोचा बजेट स्मार्टफोन लाँच, 20W टर्बो चार्जिंगसह इतर आकर्षक फीचर्स

| Updated on: Jun 09, 2022 | 1:42 PM

या नवीन स्मार्टफोनमध्ये डिसप्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे. स्नॅपड्रॅगन 480 प्लस प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Adreno 619 GPU देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅमसह 128 GB स्टोरेज मिळेल.

Moto: 5G प्रोसेसरसह मोटोचा बजेट स्मार्टफोन लाँच, 20W टर्बो चार्जिंगसह इतर आकर्षक फीचर्स
Moto G62 5G
Image Credit source: Twitter
Follow us on

मोटोरोलाने (Motorola) आपला नवीन फोन मोटो जी65 5जी (Moto G62 5G) लाँच केला आहे. Moto G62 5G हा स्मार्टफोन सध्या ब्राझीलमध्ये लाँच झाला आहे. Moto G62 5G हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 480 प्लस प्रोसेसर 4GB रॅमसह ग्राहकांच्या भेटीसाठी येत आहे. Moto G62 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिसप्ले (Display) देण्यात आला आहे. यात मागील भागात तीन कॅमेरे देखील आहेत. यात, प्राथमिक लेंस 50 मेगापिक्सेल आहेत. सध्या हा फोन ब्राझीलमध्ये दाखल झाला असला तरी लवकरच भारतीय बाजारातदेखील तो लवकरच येईल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

काय असणार फोनची किंमत

कंपनीने अद्याप Moto G62 5G च्या किंमतीबद्दल माहिती दिलेली नाही परंतु त्यांनी आपल्या वेबसाइटवर याची माहिती लिस्टेड केली आहे. Moto G62 5G ग्रेफाइट आणि ग्रीन कलरमध्ये खरेदी करता येईल. Moto G62 5G हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात कधी येईल याबाबत कंपनीकडून काहीही सांगण्यात आलेले नाही.

काय आहेत फीचर्स

Moto G62 5G अँड्रोईड 12 वर My UX सह चालतो. यात 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5 इंचाचा फुल HD+ डिसप्ले आहे. डिसप्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे. स्नॅपड्रॅगन 480 प्लस प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Adreno 619 GPU मिळेल. फोनमध्ये 4 GB रॅमसह 128 GB स्टोरेज मिळेल.

हे सुद्धा वाचा

कॅमेरा फीचर्स

मोटोरोलाच्या या नवीन फोनमध्ये तीन कॅमेरे देण्यात आले आहेत ज्यात प्राथमिक लेंस 50 मेगापिक्सेलची आहे, ज्यामध्ये अपर्चर f/1.8 आहे. दुसरी लेंस 8 मेगापिक्सेल हायब्रिड अल्ट्रा-वाइड अँगल आहे. त्याचे फील्ड व्ह्यू 118 अंश आहे. तिसरी लेंस 2 मेगापिक्सेल मॅक्रो आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

5000mAh बॅटरी

कनेक्टिव्हिटीसाठी Moto G62 5G मध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.1, GPS/AGPS, NFC आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे. यात 20W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. स्मार्टफोनचे वजन 184 ग्रॅम आहे.