Made In India गेम्स Pubg ला पछाडणार? पाहा देशातील टॉप-5 गेम्स

| Updated on: Feb 19, 2021 | 4:18 PM

भारतात मोबाईल गेमिंग उद्योगाला मोठी मागणी आहे आणि गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी आपल्या देशात मोठा स्कोपदेखील आहे.

1 / 6
भारत किफायतशीर स्मार्टफोन आणि स्वस्त इंटरनेट सुविधा देणारा देश आहे. भारतात मोबाईल गेमिंग उद्योगाला मोठी मागणी आहे आणि गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी आपल्या देशात मोठा स्कोप आहे. मोबाइल गेमिंग लोकांच्या जीवनात मनोरंजनाचा एक खास स्रोत बनला आहे. भारतात पबजीसारख्या मोबाईल गेम्सना प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. परंतु भारतात इतकी लोकप्रियता मिळवणारा पबजी पहिलाच मोबाईल गेम नाही. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच टॉप 5 मोबाईल गेम्सबद्दल माहिती देणार आहोत.

2 / 6
FAU-G : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या महिन्यात प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) nCore गेम्सने FAU-G हा बॅटल गेम लाँच केला. लाँचिंगनंतर अवघ्या 24 तासात या गेमने एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. 24 तासांत गुगल प्ले स्टोरवरुन तब्बल 1 मिलियन (10 लाख) युजर्सने हा गेम डाऊनलोड केला आहे. PUBG हा गेम भारतात बॅन केल्यानंतर युजर्समध्ये FAU-G गेमबाबत खूप मोठी क्रेझ होती. ही क्रेझ लाँचिंगनंतर समोर आलेल्या डाऊनलोड्सच्या आकडेवारीवरुन पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.  FAU-G गेमच्या टीझरमध्ये लडाख घाटीच्या गलवान खोऱ्याला दाखवण्यात आलं आहे. यामध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमधील लढा दाखवण्यात आला आहे. या टीझरमध्ये भारतीय सैनिकांना शत्रूशी लढताना दाखवण्यात आलं आहे. यामध्ये काही टास्क दिले जातील. तुम्हाला तिथे जावं लागेल आणि दहशतवाद्यांशी भिडावं लागेल. हे तेच ठिकाण आहे जिथे भारतीय सेनेने अनेक ऑपरेशन केले आहेत. गेममध्ये युद्धासाठी गरजेचे असलेले सामान दिसत आहे. यामध्ये असॉल्ट रायफलसह अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्र पाहायला मिळत आहेत.

3 / 6
रियल क्रिकेट 20 (Real Cricket 20) : क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे, देशभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी प्ले स्टोरवर एक क्रिकेट गेम उपलब्ध आहे. रियल क्रिकेट 20 (Real Cricket 20) असं या गेमचं नाव आहे. हा गेमदेखील देशात खूप लोकप्रिय आहे. रिअल क्रिकेट 20 हा भारतातील सर्वाधिक डाउनलोड केलेला खेळ बनला आहे. या गेमने मोठ्या संख्येत गेमिंग चाहत्यांना आकर्षित केलं आहे. Google Play Store वर हा गेम 1 कोटीहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आला आहे.

4 / 6
लुडो किंग (Ludo King) : लुडो किंग या गेमने COVID-19 लॉकडाऊनदरम्यान मोठ्या प्रमाणात युजर्सना आकर्षित केलं होतं. हा ऑनलाईन मल्टीप्लेअर गेम आहे. लॉकडाऊन काळात लोक घरीच बसून होते. मित्रपरिवाराला भेटू शकत नव्हते. अशा काळात अनेक लोक ऑनलाईन लुडो किंग खेळायचे. विशेष म्हणजे हा गेम लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वचजण खेळू शकतात. त्यामुळे या गेमला मोठी लोकप्रियता मिळाली. तसेच हा गेम खेळण्यासाठी खूप महागड्या स्मार्टफोन्सची (अधिक रॅम, ग्राफिक्स असलेल्या स्मार्टफोन्सची) गरज भासत नाही.

5 / 6
इंडियन एयर फोर्स (Indian Air Force) : जर तुम्ही Pubg किंवा FAUG प्रेमी असाल तर इंडियन एयर फोर्स (Indian Air Force) हा गेम तुम्हाला खूप आवडेल. या गेममध्ये खेळाडूला एका IAF वायू योद्ध्याची भूमिका पार पाडायची आहे, जो देशाच्या शत्रूंशी लढेल आणि आपल्या देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवेल. हा गेम सिंगल प्लेअर आणि मल्टीप्लेअर अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळता येतो.

6 / 6
WWE रेसिंग शोडाऊन (WWE Racing Showdown) : अमेरिकेनंतर डब्ल्यूडब्ल्यूईसाठी भारत जगातलं दुसरं सर्वात मोठं मार्केट आहे. त्यामुळेच या गेमला भारतात खूप लोकप्रियता मिळाली आहे. हा गेम WWE फाईट आणि रेसिंगचं कॉम्बिनेशन आहे.