
व्हॉट्सॲप म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग! गुड मॉर्निंगच्या मेसेजपासून ते ऑफिसच्या महत्त्वाच्या चर्चांपर्यंत, सगळं काही व्हॉट्सॲपवरच चालतं. पण अनेकदा असं होतं की, एखाद्या ग्रुपमध्ये किंवा पर्सनल चॅटमध्ये इतके मोठे मोठे, लांबलचक मेसेज येतात की ते पूर्ण वाचायचाच कंटाळा येतो. महत्त्वाचा मुद्दा काय आहे, हे शोधायला खूप वेळ लागतो.
पण आता व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे! व्हॉट्सॲप लवकरच एक असं नवीन आणि जबरदस्त फीचर आणण्याच्या तयारीत आहे, जे तुमची ही अडचन कायमची संपवू शकतं. त्या फिचरचं नाव आहे ‘Message Summary’
WAbetainfo नुसार, व्हॉट्सॲप सध्या एका ‘Message Summary’ नावाच्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर AI वापरून काम करेल.
कसं काम करेल? जेव्हा तुम्हाला एखादा खूप मोठा मेसेज येईल, तेव्हा हे फीचर त्या मेसेजमधील महत्त्वाचे मुद्दे ओळखून त्याचा एक छोटा, संक्षिप्त सारांश तयार करेल. म्हणजे, तुम्हाला पूर्ण मेसेज न वाचताही त्यातील मुख्य गोष्ट काय आहे, हे लगेच समजेल.
हे फीचर तुमच्या पर्सनल चॅट्स, ग्रुप चॅट्स आणि व्हॉट्सॲप चॅनल्समध्ये येणाऱ्या मेसेजसाठी काम करेल, असा अंदाज आहे.
उदाहरणार्थ : जर खूप सारे नवीन मेसेज आले असतील, तर Meta AI वापरून हे फीचर त्या सगळ्या नवीन मेसेजमधील महत्त्वाचे मुद्दे वेगळे काढून तुम्हाला दाखवेल. हे सगळं फक्त एका बटणाच्या क्लिकवर उपलब्ध होऊ शकतं!
या फीचरमुळे यूजर्सचा खूप वेळ वाचणार आहे. विशेषतः ज्यांना कामाच्या ग्रुप्समध्ये किंवा अनेक चॅट्समध्ये सतत मोठे मेसेज येत राहतात, त्यांच्यासाठी हे खूपच उपयोगी ठरेल. Information Overload कमी होईल आणि महत्त्वाचे मुद्दे पटकन लक्षात येतील.
व्हॉट्सॲप हे फीचर आणताना यूजर्सच्या Privacy ची पूर्ण काळजी घेईल, असं सांगितलं जात आहे. सध्या हे फीचर WhatsApp Android Beta Version 2.25.15.12 मध्ये टेस्टिंगसाठी उपलब्ध झालं आहे. याचा अर्थ, लवकरच ते सर्वसामान्य यूजर्ससाठीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.