आता फक्त पंन्नास रूपयांत मिळवा हे स्मार्ट आधार कार्ड, दिसायला अगदी एटीएमसारखे

UIDAI च्या मते, नवीन PVC कार्डची छपाई आणि लॅमिनेशनची गुणवत्ता चांगली आहे, जे दिसायला आकर्षक आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पीव्हीसी आधार कार्ड पावसातही खराब होणार नाही. ते खिशात सहज बसेल.

आता फक्त पंन्नास रूपयांत मिळवा हे स्मार्ट आधार कार्ड, दिसायला अगदी एटीएमसारखे
आधार कार्ड
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 15, 2023 | 8:31 PM

मुंबई : बँक खाते उघडणे असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणे असो, प्रत्येक कामात आधार क्रमांक विचारला जातो. आजच्या युगात, आधार कार्डचा (Aadhar Card) वापर मुख्यतः पत्त्याचा पुरावा म्हणून केला जात आहे. याशिवाय मुलांच्या शालेय प्रवेशासाठीही आधार कार्ड आवश्यक आहे. जर असे महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे तुमचे आधार कार्ड काही कारणाने हरवले तर तुम्ही काळजीत पडाल. काळजी वाटणे स्वाभाविक आहे. पण तुम्ही काही दिवसांत दुसरे आधार कार्ड मागवू शकता. तेही नवीन पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVC) कार्ड, जे अगदी एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्डसारखे दिसते, जे तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये सहज ठेवू शकता.

इतकेच नाही तर आता बहुतेक लोक पीव्हीसी आधार कार्ड बाळगतात. यासाठी तुम्हाला फक्त 50 रुपये खर्च करावे लागतील, ज्यामध्ये स्पीड पोस्टचा खर्च देखील समाविष्ट आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आता आधार कार्डचे पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVC) कार्ड जारी करत आहे, हे चमकणारे PVC आधार कार्ड कसे ऑर्डर करायचे, खाली तपशीलवार जाणून घ्या.

पीव्हीसी आधार कार्ड कसे ऑर्डर करावे

सर्वप्रथम, UIDAI ची अधिकृत वेबसाइट (https://uidai.gov.in) उघडा, त्यानंतर ‘माय आधार विभागात’ ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ वर क्लिक करा. तुम्ही ऑर्डर Aadhaar PVC कार्ड वर क्लिक करताच, तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी EID टाकावा लागेल, या तिन्हीपैकी कोणताही एक टाकावा लागेल.

आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड टाका. यानंतर खालील Send OTP वर क्लिक करा. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. ओटीपी टाकल्यानंतर खाली दाखवलेल्या सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर पीव्हीसी कार्डची प्रिव्ह्यू कॉपी दिसेल. ज्यामध्ये तुमच्या आधारशी संबंधित तपशील असतील.

जर तुमचा मोबाईल नंबर आधार डेटाबेसमध्ये नोंदणीकृत नसेल तर विनंती OTP समोर दिलेल्या संबंधित पर्यायावर क्लिक करा. हा पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर विचारला जाईल. नवीन मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर, तुम्हाला ओटीपी पाठवा बटणावर क्लिक करावे लागेल.

शेवटी पेमेंटचा पर्याय येईल. त्यावर क्लिक करून तुम्हाला विविध डिजिटल माध्यमांद्वारे 50 रुपये भरावे लागतील. त्यानंतर आधार पीव्हीसी कार्ड मागवले जाईल. काही दिवसांनी पीव्हीसी आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे तुमच्या घरी पोहोचेल. चमकणारे आधार कार्ड तुमच्या घरी जास्तीत जास्त १५ दिवसात पोहोचेल.

पीव्हीसी आधार कार्डची वैशिष्ट्ये

UIDAI च्या मते, नवीन PVC कार्डची छपाई आणि लॅमिनेशनची गुणवत्ता चांगली आहे, जे दिसायला आकर्षक आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पीव्हीसी आधार कार्ड पावसातही खराब होणार नाही. ते खिशात सहज बसेल.

आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज

याशिवाय पीव्हीसी आधार कार्ड आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. सुरक्षिततेसाठी, या नवीन कॉर्डमध्ये होलोग्राम, गुइलोचे पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन पीव्हीसी आधार कार्डसह, क्यूआर कोडद्वारे कार्डची सत्यता त्वरित पुष्टी केली जाऊ शकते. यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही.