
मुंबई, आयओएसचे चॅट जीटीपी (Open AI Chat GTP) हे ऍप आता अँड्रॉइडवर लॉन्च होणार आहे. त्याची माहिती चॅट जीटीपी तयार करणाऱ्या ओपन एआयने शेअर केली आहे. हे ऍप गुगल प्ले स्टोअरवर सूचीबद्ध आहे. ओपन एआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. हे ऍप ऍपल यूजर्ससाठी आधीच रिलीज करण्यात आले आहे. ओपन एआयने ट्विट केले की, अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी चॅट जीटीपीचे ऍप पुढील आठवड्यात लॉन्च केले जाईल. 22 जुलैपासून गूगल प्ले स्टोअरवर प्री-ऑर्डर सुरू झाली आहे. तथापि, जर तुम्हाला एआय वैशिष्ट्यांसाठी एखादे ऍप वापरायचे असेल तर तुम्ही मायक्रोसॉफ्टचे बिंग ऍप वापरू शकता. हे मायक्रोसॉफ्ट ऍप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीसाठी रिलीज करण्यात आले आहे.
Announcing ChatGPT for Android! The app will be rolling out to users next week, and you can pre-order in the Google Play Store starting today: https://t.co/NfBDYZR5GI
— OpenAI (@OpenAI) July 21, 2023
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅट जीटीपीच्या अँड्रॉइड व्हर्जनचे लॉन्चिंग योग्य वेळी होणार आहे. सेन्सर टाॅवर आणि सिमीलर वेब मधील डेटाने जूनमध्ये वेब ट्रॅफिक आणि ऍप इंस्टॉलेशनमध्ये घट दर्शविली आहे.
चॅट जीटीपीच्या मागे असलेली कंपनी ओपन एआयने सांगितले की ती सर्व तक्रारींना प्रतिसाद देत आहे. यासोबतच त्यांनी आगामी अपडेटमध्ये सुधारणा करण्यासाठी काम सुरू केले आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांना लवकरच चॅट जीटीपी अॅपचा अनुभव घेता येणार आहे. यासह, तुम्ही या एआय प्रणालीची प्रगत वैशिष्ट्ये एक्सप्लोर करण्यास सक्षम असाल. तसेच, कंपनी अॅपवर वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी काम करत आहे.
वास्तविक, भारतासह संपूर्ण जगात अशी चर्चा आहे की चॅटजीपीटीसह इतर अनेक एआय प्लॅटफॉर्ममुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळात हे अनेक प्रोग्रॅमर आणि कोडिंग करणाऱ्या लोकांचे काम गिळंकृत करेल अशी भीती आहे.