आता तुमची ओळख आणखीन होणार सुरक्षित, UIDAI ने एक नवीन आधार ॲप केले लाँच

UIDAI ने एक नवीन आधार ॲप सादर केले आहे, ज्याची माहिती विभागाने स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केली आहे. UIDAI ने म्हटले आहे की यामुळे वापरकर्त्यांची सुरक्षितता वाढेल. चला तर मग आजच्या लेखात या नवीन ॲपबद्दल जाणून घेऊयात.

आता तुमची ओळख आणखीन होणार सुरक्षित, UIDAI ने एक नवीन आधार ॲप केले लाँच
New Aadhaar App
Image Credit source: Google Play Store
| Edited By: | Updated on: Nov 12, 2025 | 3:49 AM

देशातील सर्वात महत्त्वाचा ओळखपत्र असलेला आधार कार्ड आता अधिक आधुनिक स्वरूपात उपलब्ध आहे. UIDAI ने एक नवीन आधार ॲप लाँच केले आहे, जे पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित, सोपे आणि पेपरलेस आहे. आता आधारशी संबंधित बहुतेक सेवा मोबाईलवर कधीही कुठेही वापरता येणार आहे. सरकारने लाँच केलेल्या या नवीन ॲपमध्ये कोणते फिचर्स असतील आणि तुम्ही ते कसे वापरू शकता? चला तर मग आजच्या लेखात आपण या नवीन आधार कार्डच्या ॲप बद्दल जाणून घेऊयात.

UIDAI ने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन ॲपची अधिकृत घोषणा केली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की हे नवीन ॲप अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहे. तर ॲपची लॉगिन प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे आणि डेटा सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे. UIDAI ने वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेवर जोरदार लक्ष केंद्रित केले आहे.

नवीन आधार ॲप काय आहे?

UIDAI चे नवीन आधार ॲप देशातील डिजिटल ओळख प्लॅटफॉर्मला आणखी मजबूत करण्यासाठी लाँच केले आहे. तरा हे ॲप वापरकर्त्यांना सर्व ओळख-संबंधित सेवा डिजिटल पद्धतीने सुरक्षितपणे वापरण्याची परवानगी देते. त्यामुळे आता नेहमी फिजिकल आधार कार्ड सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही.

नवीन आधार ॲपची प्रमुख फिचर्स

हे ॲप वापरकर्त्यांना त्यांची ओळख डिजिटल पद्धतीने शेअर करण्याची परवानगी देते आणि त्यात QR कोड स्कॅनिंग आणि चेहरा ओळखणे यासारख्या फिचर्सचा समावेश आहे.

यामध्ये बायोमेट्रिक डेटा लॉक किंवा अनलॉक करण्याची सुविधा देखील आहे, ज्यामुळे गैरवापराचा धोका कमी होतो.

वापरकर्ते कोणती आधार माहिती शेअर करायची आणि कोणती शेअर करू नये हे ठरवू शकतात, ज्यामुळे गोपनीयता आणखी मजबूत होते.

आधार पडताळणी फेस स्कॅनद्वारे करता येते, ज्यामुळे सुरक्षा वाढते. तुमचा आधार कधी आणि कुठे वापरला गेला आहे हे देखील तुम्हाला या ॲपद्वारे समजणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड एकाच ॲपमध्ये सुरक्षितपणे लिंक केले जाऊ शकतात.

ॲप कसे सेट करावे?

अँड्रॉइड किंवा आयओएस स्टोअरवरून ‘आधार ॲप’ डाउनलोड करा.

आवश्यक परवानगी दिल्यानंतर तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.

अटी आणि शर्ती स्वीकारा आणि आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर व्हेरिफाय करा कारण मोबाईल पडताळणीशिवाय ॲप सेटअप करता येणार नाही.

आता फेस ऑथेंटिकेशन करा.

शेवटी ॲपसाठी एक सुरक्षा पिन सेट करा आणि आधार सेवा वापरण्यास सुरुवात करा.