सेल..सेल..! कमी किमतीत मिळतोय OnePlus 11 5G स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

| Updated on: Feb 14, 2023 | 4:31 PM

OnePlus 11 5G स्मार्टफोन आजपासून भारतात उपलब्ध झाला आहे. या स्मार्टफोनवर काही ऑफर्स असून तुम्हाला स्वस्तात खरेदी करू शकता. यासाठी अॅमेझॉन आणि अधिकृत वेबसाईटवरून फोन खरेदी करावा लागले.

सेल..सेल..! कमी किमतीत मिळतोय OnePlus 11 5G स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स
आजपासून विकत घेऊ शकता OnePlus 11 5G स्मार्टफोन, जाणून घ्या खासियत आणि किंमत
Follow us on

मुंबई : वनप्लस कंपनीने आपला जबरदस्त क्षमता असलेला फ्लॅगशिप फोन वनप्लस 11 5जी भारतात विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स तगडे असल्याने ग्राहकांची झुंबड उडाली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन क्लाउड 11 इव्हेंटमध्ये सादर केला होता. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यांयासह उपलब्ध आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज, 16 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटचा समावेश आहे. अ‍ॅमेझॉन इंडिया आणि अधिकृत वेबसाईटवरून हा स्मार्टफोन तुम्ही विकत घेऊ शकता. आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड, ईएमआय किंवा नेटबँकिंगवर 1 हजार रुपयांची सवलत मिळत आहे. चायनीज कंपनीने या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 ची चिपसेट टाकली आहे. त्यामुळे या स्मार्टफोनचा प्रोसेसिंग स्पीडही जबरदस्त आहे. हा स्मार्टफोन आयफोन आणि सॅमसंगशी थेट स्पर्धा करणार आहे.

OnePlus 11 5G स्पेसिफिकेशन

वनप्लस 11 5G मध्ये 6.7 इंचांची 2के रिझॉल्यूशन असलेली अमोलेड डिस्प्ले आहे. यामुळे 120 एचझेड रिफ्रेश रेट मिळतो. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेनरेशन 2 प्रोसेसह आणि अँड्रॉईड 13 सह ऑक्सिजन ओएस 13 आहे. विशेष म्हणजे कंपनी या स्मार्टफोनमध्ये चार वर्षापर्यंत अपडेट देणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिलेला आहे.

यापैकी प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स890 सेंसर, सेकंडरी कॅमेरा 32 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स709 सेंसर आणि तिसरा 48 मेगा पिक्सल अल्ट्रा वाईड अँगल सोनी आयएमएक्स581 सेंसरसह येतो.फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिलेला. तसेच मोबाईलसाठी 5000 एमएएच बॅटरी आणि 100 वॅट चार्जिंगसह सादर केली आहे. ही बॅटरी 25 मिनिटात चार्ज होते, असा दावा कंपनीने केला आहे.

OnePlus 11 5G किंमत

वनप्लस 11 5G चा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजवाला फोन 56,999 रुपयांना, तर 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजवाला फोन 61,999 रुपयांना मिळत आहे. त्याचबरोबर इतर बँकिंग ऑफर पाहता हा स्मार्टफोन आणखी स्वस्तात उपलब्ध होतो. वनप्लस 11 5जीसह कंपनीने वनप्लस बड्स प्रो 2 आणि वनप्लस पॅड, वनप्लस 11आर आणि वनप्लस स्मार्ट टीव्हीही लाँच केला आहे.