7000mAh बॅटरीसह वनप्लसचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
वनप्लस N6x भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये 7000mAh बॅटरी, 13-मेगापिक्सलचा कॅमेरा असून तो अँड्रॉइड 16 वर आधारित ऑक्सिजनओएस 16 (OxygenOS 16) वर चालतो. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

वनप्लसने भारतात त्यांचा नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन OnePlus N6x लाँच केला आहे. या फोनमध्ये मोठी 7000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6360 एपेक्स चिपसेट आहे. कंपनीने हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंट आणि दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला आहे. हा स्मार्टफोन ४ ऑगस्टपासून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि हा फोन खरेदीवर ग्राहकांना आकर्षक बँक ऑफर्सही मिळतील. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.
वनप्लस एन6x स्मार्टफोनची भारतातील किंमत, विक्रीची तारीख आणि ऑफर्स
वनप्लस N6x च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 18 हजार 999 रूपयांपासून सुरू होते. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 20 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध होईल. कंपनी निवडक बँक कार्डांवर 1 हजार 500 रूपयांची इन्स्टंट डिस्काउंट देखील देत आहे. ग्राहकांना सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चे पर्याय देखील मिळतील. हा स्मार्टफोन तुम्ही ॲमेझॉन आणि वनप्लसच्या ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करू शकता. तसेच हा फोन तुम्हाला बरगंडी रेड आणि आइस ब्लू या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
वनप्लस एन6 एक्सचे फिचर्स
वनप्लस N6x ड्युअल सिम सपोर्टसह येतो आणि अँड्रॉइड 16 वर आधारित ऑक्सिजनओएस 16 वर चालतो. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 900 निट्स पीक ब्राइटनेस आणि 254 ppi पिक्सेल डेन्सिटीसह 6.8-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे.
यात डार्क मोड, आय प्रोटेक्शन मोड, स्क्रीन कलर टेम्परेचर ॲडजस्टमेंट आणि मल्टिपल स्क्रीन कलर मोड्सची वैशिष्ट्ये देखील आहेत.
हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6360 एपेक्स ऑक्टा-कोर चिपसेटद्वारे समर्थित आहे, जो 4GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह जोडलेला आहे.
कंपनीने सुधारित थर्मल मॅनेजमेंटसाठी 13,280 चौरस मिलिमीटर क्षेत्रफळाची व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टीम देखील या फोनमध्ये दिली आहे.
वनप्लस एन6x: कॅमेरा, बॅटरी आणि इतर फिचर्स
फोटोग्राफीसाठी वनप्लस N6x मध्ये f/2.2 अपर्चर, CMOS सेन्सर, ऑटोफोकस आणि 10x डिजिटल झूमसह 13-मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन 1080p 30 fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. यात 7000mAh ची मोठी बॅटरी असून 15W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 5W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनचे माप 166.38×78.13×8.65mm आहे आणि या फोनचे वजन अंदाजे 214 ग्रॅम आहे.