‘या’ नवीन वनप्लस टॅबलेटची भारतात विक्री सुरू, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

1 ऑगस्टपासून भारतात OnePlus Pad Lite ची विक्री सुरू झाली आहे. तसेच उत्तम फिचर्ससह तुम्हाला हा बजेट फ्रेंडली टॅबलेट खरेदी करता येणार आहे. यात मोठी 9340mAh बॅटरी देण्यात आली आहे. लॉन्च नंतर अनेक ऑफर्स देण्यात आलेले आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊयात...

या नवीन वनप्लस टॅबलेटची भारतात विक्री सुरू, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
One plus pad
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Aug 29, 2025 | 5:43 PM

वनप्लस पॅड लाइट आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा वनप्लसचा नवीन बजेट-फ्रेंडली टॅबलेट आहे. या टॅबलेट मध्ये तुम्हाला 11 इंचाचा डिस्प्ले, हाय-रेझ ऑडिओ प्रमाणित क्वाड स्पीकर सिस्टम आणि 80 तासांपर्यंत म्युजिक प्लेबॅक प्रदान करण्याचा दावा करते. तसेच यामध्ये 9340 mAh बॅटरी देखील देण्यात आलेली आहे. भारतात हा टॅबलेट15, 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. त्यात कंपनीने लाँच ऑफर अंतर्गत अनेक डील आणि सवलती या टॅबलेटच्या खरेदीवर देत आहेत.

1 ऑगस्ट 2025 पासून भारतात OnePlus Pad Lite ची विक्री सुरू झाली आहे. हा टॅबलेट तुम्ही OnePlus India वेबसाइट, Amazon India, Flipkart, OnePlus Store अॅप आणि OnePlus Experience Stores वरून खरेदी करू शकता. खरेदीदार ते Croma, Reliance Digital, Vijay Sales, Bajaj Electronics आणि इतर ऑफलाइन आउटलेटवरून देखील खरेदी करू शकतात.

वनप्लस पॅड लाइटची भारतातील किंमत आणि लाँच ऑफर्स

वनप्लस पॅड लाइट भारतात दोन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे:

– 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या वाय-फाय-ओन्ली व्हर्जनची किंमत 15,999 रुपये आहे.

– 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या वाय-फाय + 4जी एलटीई मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे.

लाँच ऑफर म्हणून, OnePlus काही निवडक कार्ड्सवर 2000 रुपयांपर्यंतची इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि मर्यादित काळासाठी 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे, ज्यामुळे एकूण 3000 रूपयांपर्यंत सुट देण्यात येत आहे. याशिवाय, निवडक क्रेडिट कार्ड्सवर सहा महिन्यांपर्यंतचा नो-कॉस्ट EMI देखील दिला जात आहे, ज्यामुळे पेमेंट करणे आणखी सोपे होते.

वनप्लस पॅड लाइटची स्पेसिफिकेशन आणि फिचर्स

वनप्लस पॅड लाईटमध्ये 11 इंचाची स्क्रीन आहे ज्याचा आस्पेक्ट रेशो 16:10 आहे आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशो 85.3 टक्के आहे. तर या टॅबचा डिस्प्ले 10-बिट कलर डेप्थ आणि 500निट्स पर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यात ब्लू लाइट रिड्यूसिंग टेक्नॉलॉजी आणि अँटी-फ्लिकर टेक्नॉलॉजी सारखी डोळ्यांना आराम देणारे फिचर्स आहेत, टॅब्लेटची जाडी 7.39 मिमी आहे आणि त्याचे वजन 530 ग्रॅम आहे, ज्यामुळे ते सहज कोठेही घेऊन जाऊ शकता.

या टॅबलेटमध्ये MediaTek Helio G100 प्रोसेसर आहे आणि तो OxygenOS 15.0.1 वर चालतो. तसेच यात मल्टीटास्किंगसाठी Open Canvas सारखी टुल्स आहेत, ज्यामुळे एकाच वेळी अनेक अॅप्स चालवता येतात. यात Screen Mirroring, Shared Clipboard आणि Gallery Sync सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत जी वनप्लस डिव्हाइसेससह चांगले इंटीग्रेशन करते.

या टॅबलेटची बॅटरी ही त्याची खासियत आहे. यात 9340 mAh बॅटरी आहे, यात 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे जो बॅटरी लवकर चार्ज करतो.

या टॅब्लेटमध्ये मुलांसाठी किड्स मोड देखील आहे. तसेच लहान मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून डोळ्यांच्या संरक्षणासाठी विशेष सेटिंग्ज आहेत. त्यात गुगल किड्स स्पेस प्री-इंस्टॉल केलेले आहे. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर, त्यात अँड्रॉइडसाठी क्विक शेअर आणि iOS/iPadOS साठी O+ कनेक्ट सपोर्ट आहे.