OPPO चा किफायतशीर 5G स्मार्टफोन सादर, जाणून घ्या नव्या फोनमध्ये काय आहे खास?

| Updated on: Oct 28, 2021 | 6:02 PM

OPPO ने या वर्षाच्या सुरुवातीला Oppo A54 स्मार्टफोन लॉन्च केला होता आणि त्यानंतर 5G सपोर्टसह नवीन व्हेरिएंट लाँच करण्यात आलं. आता कंपनीने आणखी एक नवीन व्हेरिएंट लॉन्च केलं आहे, ज्याचे नाव Oppo A54S आहे.

OPPO चा किफायतशीर 5G स्मार्टफोन सादर, जाणून घ्या नव्या फोनमध्ये काय आहे खास?
OPPO A54s 5G
Follow us on

मुंबई : OPPO ने या वर्षाच्या सुरुवातीला Oppo A54 स्मार्टफोन लॉन्च केला होता आणि त्यानंतर 5G सपोर्टसह नवीन व्हेरिएंट लाँच करण्यात आलं. आता कंपनीने आणखी एक नवीन व्हेरिएंट लॉन्च केलं आहे, ज्याचे नाव Oppo A54S आहे. तसेच हा स्मार्टफोन इटलीच्या Amazon वर लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन क्रिस्टल ब्लॅक आणि पर्ल ब्लू कलरमध्ये येतो. तसेच हा स्मार्टफोन 18 नोव्हेंबरला लॉन्च होईल. (Oppo A54s 5G smartphone launched with Helio G35, 5,000 mAh battery)

या फोनच्या मुख्य स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, हा 5G सपोर्टसह येणारा एक परवडणारा स्मार्टफोन आहे. यात मीडियाटेक प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम आहे. तसेच, या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत EUR 229.99 (अंदाजे 20 हजार रुपये) ठेवली आहे.

OPPO A54s 5G मध्ये काय आहे खास?

OPPO A54s च्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात 6.52 इंचाचा HD Plus LCD डिस्प्ले आहे. हा फोन 1600 x 720 पिक्सेल रिझोल्युशनसह येतो. तसेच त्याचा स्क्रीन टू बॉडी रेशो 88.7 आहे. यात 480 nits पीक ब्राइटनेस आहे.

OPPO A54s 5G प्रोसेसर

OPPO A54s या फोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो IMG GE8320 GPU सह देण्यात आला आहे. यामध्ये मायक्रो एसडी कार्ड टाकता येईल. तसेच यामध्ये 256 GB पर्यंत स्टोरेज स्पेस वाढवता येऊ शकते.

OPPO A54s 5G कॅमेरा

या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सलचा सेन्सर आहे, ज्यामध्ये अपर्चर f/2.2 आहे. तसेच, यात 2-मेगापिक्सलचा मोनो सेन्सर आहे, जो f/2.4 अपर्चरसह येतो. यातील तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तसेच यात सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OPPO A54s 5G बॅटरी

सुरक्षेच्या दृष्टीने यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे, जो बायोमेट्रिक पद्धतीने फोन अनलॉक करण्याचे काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगसह येते.

इतर बातम्या

लेनोवो टॅब K10 टॅब्लेट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

ठरलं ! JioPhone Next ‘या’ दिवशी भारतात दाखल होणार, जाणून घ्या संभाव्य किंमत, तपशील आणि वैशिष्ट्ये

6000mAh बॅटरीसह येतात ‘हे’ 4 फोन, ज्याची सुरवातीची किंमत आहे 7,299 रुपये

(Oppo A54s 5G smartphone launched with Helio G35, 5,000 mAh battery)