
ओप्पो कंपनीने ग्राहकांसाठी Oppo Find X9 Pro हा स्मार्टफोन लाँच केला आहे. तर हा स्मार्टफोनमध्ये फक्त एक नाही तर अनेक प्रीमियम फीचर्ससह लाँच करण्यात आलेला आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी या हँडसेटसाठी पाच ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स दिले आहेत. Find X9 Pro ला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP66 + IP68 + IP69 रेटिंग दिले आहे आणि SGS ड्रॉप-रेझिस्टन्स प्रमाणित आहे. फोनचा डिस्प्ले TUV Rheinland Intelligent Eye Care 5.0 सर्टिफिकेशनसह तुम्हाला खरेदी करता येणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण ओप्पोच्या या फोनची किंमत आणि प्रीमियम फिचर्स जाणून घेऊयात…
Oppo Find X9 Pro स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: या ओप्पो स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि ब्राइटनेस 3600 निट्स आहे. फोनच्या डिस्प्लेमध्ये DC डिमिंग, HDR10+, HDR विविड आणि स्प्लॅश टच देखील आहेत.
ऑपरेटिंग सिस्टम: हा ड्युअल-सिम फोन अँड्रॉइड 16 वर आधारित कलरओएस 16 स्किनवर चालतो.
चिपसेट: हा फोन फ्लॅगशिप 3nm मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. तो 36,344.4 चौरस मिमी टोटल डिसिपेशन एरिया यांच्यासह ॲडव्हांस व्हेपर चेंबर कूलिंग सोल्यूशनचा वापर करण्यात आलेला आहे.
कॅमेरा सेटअप: या प्रीमियम दिसणाऱ्या फोनमध्ये हॅसलब्लॅड-ट्यून केलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 23 मिमी फोकल लेंथ आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 50 -मेगापिक्सेल सोनी LYT-828 प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबत 15 मिमी फोकल लेंथसह 50-मेगापिक्सेल सॅमसंग ISOCELL 5KJN5 अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 70 मिमी फोकल लेंथ आणि OIS असलेला 200-मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, 50-मेगापिक्सेल सॅमसंग 5KJN5 फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी: फोनला 7500mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे जी 80 W SuperVOOC वायर्ड आणि 50 W AirVOOC वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
कनेक्टिव्हिटी: हँडसेटमध्ये ब्लूटूथ 6.0, एआय लिंकबूस्टसह ओप्पो आरएफ चिप, वाय-फाय 7, जीपीएस, यूएसबी 3.2 जेन1 टाइप-सी आणि ग्लोनास सपोर्ट आहे. क्वाड-मायक्रोफोन सेटअपसह, फोनमध्ये सुरक्षेसाठी 3डी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आलेला आहे.
ओप्पो फाइंड एक्स 9 सिरीजची किंमत
या फोनचा एकच व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे, जो 16 जीबी रॅम आणि 512जीबी स्टोरेजने सुसज्ज आहे. या व्हेरिएंटची किंमत 1299 युरो भारतीय चलनानुसार अंदाजे 1,33,499 रुपये इतकी असेल. हा फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: सिल्क व्हाइट आणि टायटॅनियम चारकोल. जर या किमतीत भारतीय बाजारात लाँच केला गेला तर तो आयफोन 17 प्रो आणि सॅमसंग गॅलेक्सी एस25 अल्ट्रा सारख्या फोनना कडक स्पर्धा देऊ शकतो. हा फोन लवकरच भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे.