12GB-256GB, 64 MP कॅमेरासह Oppo चे दोन स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

| Updated on: Jul 02, 2021 | 5:04 PM

स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने (Oppo) नुकतीच घोषणा केली आहे की, कंपनी 14 जुलै रोजी भारतात सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन Reno-6 लाँच करणार आहे.

12GB-256GB, 64 MP कॅमेरासह Oppo चे दोन स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Oppo Reno 6 And Reno 6 Pro
Follow us on

मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने (Oppo) नुकतीच घोषणा केली आहे की, कंपनी 14 जुलै रोजी भारतात सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन Reno-6 लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये कंपनीकडून दोन स्मार्टफोन लॉन्च केले जातील, ज्यात रेनो – 6 प्रो 5 जी (Reno-6 Pro 5G) आणि रेनो – 6 5 जी (Reno-6 5G) समाविष्ट आहेत. हे दोन्ही फोन अॅडव्हान्स्ड इमेजिंग तंत्रज्ञानासह सुसज्ज आहेत. ज्यात स्मार्टफोन इंडस्ट्रीमधला पहिला बोकेह फ्लेयर पोर्ट्रेट व्हिडीओ, AI हायलाइट व्हिडीओचा समावेश आहे. (Oppo Reno 6 pro and Oppo Reno 6 smartphone is ready to launch in India on 14th july)

दोन्ही स्मार्टफोन्स 14 जुलै रोजी दुपारी 3 वाजता लाँच केले जातील. हे फोन नुकतेच फ्लिपकार्टवर पाहायला (टीझर) मिळाले आहेत. त्यावरुन स्पष्ट होतंय की, हे फोन फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटद्वारे विकले जातील. चीनमध्ये ओप्पो रेनो 6 प्रो बाजारात 3,499 युआन (जवळपास 39,800 रुपये) आणि ओप्पो रेनो 6 ची (Oppo Reno 6) किंमत 2,799 युआन (जवळपास 31,800 रुपये) इतकी होती.

Oppo Reno 6 Pro आणि Oppo Reno 6 चे स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 6 Pro मध्ये 6.55 इंचांचा फुल HD+ OLED डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. Oppo Reno 6 मध्ये 6.43 इंचांचा का फुल HD+ होल-पंच AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, जाच्या रिफ्रेश रेटदेखील 90Hz इतकाच असेल. यासह या फोनच्या प्रो मॉडेलमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC प्रोसेसरसह 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळेल. तर Oppo Reno 6 मध्ये 12GB पर्यंतचा RAM आणि 25GB पर्यंत स्टोरेजसह MediaTek Dimensity 900 SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

64 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा

या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, ओप्पो रेनो 6 प्रोमध्ये क्वाड रियर कॅमेरा मिळेल ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि दोन 2-2 मेगापिक्सेलचे अतिरिक्त सेन्सर उपलब्ध असतील. दुसरीकडे ओप्पो रेनो 6 मध्ये ट्रिपल रियर सेन्सर मिळेल ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा असेल.

बॅटरी

दोन्ही स्मार्टफोनच्या फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय ओप्पो रेनो 6 प्रो मध्ये 4500mAh क्षमतेची तर ओप्पो रेनो 6 मध्ये 4300mAh क्षमतेची बॅटरी मिळेल. यासह, दोन्ही स्मार्टफोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

इतर बातम्या

WhatsApp ला टक्कर, Telegram चे ढासू फीचर्स रोलआऊट, एकाच वेळी 30 जणांना व्हिडीओ कॉल करा

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शुभेच्छा संदेश पाठवणाऱ्या मेंबर्सना अ‍ॅडमिनचा दणका, 10 हजारांचा दंड वसूल!

PUBG Mobile मध्ये Tesla च्या गाड्या दिसणार, कंपनीकडून मोठ्या भागीदारीची घोषणा

(Oppo Reno 6 pro and Oppo Reno 6 smartphone is ready to launch in India on 14th july)