लाँचिंगपूर्वीच iPhone 15 चे फोटो झाले लीक! चार्जिंग पोर्टबाबत मोठा खुलासा

| Updated on: Feb 23, 2023 | 4:34 PM

अ‍ॅपल कंपनीने या मोबाईलचे 14 सीरिज बाजारात लाँच केले आहे. साधारणत:कंपनी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नव्या फीचर्ससह आयफोन सीरिज लाँच करत असते. तत्पूर्वी आयफोन 15 या फोनचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत.

लाँचिंगपूर्वीच iPhone 15 चे फोटो झाले लीक! चार्जिंग पोर्टबाबत मोठा खुलासा
iPhone 15 सीरिजबाबत उत्सुकता शिगेला, चार्जिंग पोर्ट पाहून तुम्हीही व्हाल खूश
Follow us on

मुंबई : अ‍ॅपल कंपनी दरवर्षी आयफोनच्या नव्या सीरिजची घोषणा करते. आता 2023 हे वर्ष सुरु झालं असून कंपनीने आयफोन 15 सीरिजसाठी कंबर कसली आहे.आतापर्यंत कंपनीने या मोबाईलचे 14 सीरिज बाजारात लाँच केले आहे. साधारणत:कंपनी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नव्या फीचर्ससह आयफोन सीरिज लाँच करत असते. तत्पूर्वी आयफोन 15 या स्मार्टफोनचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्या आयफोन 15 सी टाइप चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. सोशल मीडियावर लीक झालेल्या आयफोन 15 आणि आयफोन 15 प्रोच्या लीक झालेल्या फोटोतून ही माहिती समोर आली आहे.MacRumors नं हे फोटो शेअर केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आयफोनमध्ये युएसबी सी टाईप पोर्ट असण्याची शक्यता वर्तवली जात होती. युरोपियन युनियन आणि भारतानं याबाबत नियमावली तयार केल्यानंतर आयफोनला झुकावं लागल्याचं समोर आलं आहे.

मॅकरुमर्सनं दिलेल्या माहितीनुसार, लीक झालेल्या फोटोतील आयफोनमध्ये सी टाइप पोर्ट दिलेला आहे. लाइटनिंग पोर्टची जागा आता सी टाइपनं घेतली आहे. लाइटनिंग पोर्ट कंपनी आयफोनमध्ये 2012 पासून आतापर्यंत वापरत आली आहे. युरोपियन ई वेस्ट बाबत कडक कायदा करत सिंगल चार्जर नीति अवलंबली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता आयफोननं आपल्या चार्जिंग पोर्टमध्ये बदल करत सी टाईप पोर्टचा स्वीकार केला आहे.

आयफोन 15 चा समोरील फोटो पाहिल्यानंतर या स्मार्टफोनबाबत अंदाज येतो. आयफोन 14 तुलनेत फोनच्या डिझाईनमध्ये फारसा बदल केलेला नाही. आयफोन 15 लूक आयफोन 14 प्रमाणे डायनामिक आयलँडसारखाच आहे. युएसबी टाईप सीच्या माध्यमातून डाटा ट्रान्सफर हायस्पीडनं होईल. अन्य सर्व मॉडेल्समध्ये डाटा ट्रान्सफर युएसबी 2.1 च्या माध्यमातून होईल. हा स्पीड सामान्य आहे.

अ‍ॅपल कंपनी आयफोन 15 सीरिज सप्टेंबर 2023 या महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. या सीरिजअंतर्गत आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो अल्ट्रा यांचा समावेश असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये डायनामिक आयलँड आणि युएसबी सी पोर्टसह ए17 बायोनिक चिप असण्याची शक्याता. त्याचबरोबर प्रो मॉडेलमध्ये टिटानियम फ्रेम आणि इतर फीचर्स असण्याची शक्यता आहे.