AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र यांचा खरा वारस कोण? 450 कोटींच्या प्रॉपर्टीमधील सर्वात जास्त हिस्सा 6 जणांपैकी या मुलाला मिळणार, कायदा काय सांगतो?

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या 450 कोटींच्या मालमत्तेचा वारस कोण, हा प्रश्न चर्चेत आहे. कायदेशीरदृष्ट्या, त्यांच्या दोन्ही पत्नींची मुले या संपत्तीचे समान हक्कदार ठरणार का? सर्वोच्च न्यायालयाच्या 2023 च्या निर्णयनुसार, दुसऱ्या लग्नातून जन्माला आलेल्या मुलांना पालकांच्या मालमत्तेत पूर्ण वाटा मिळणार का? याबद्दल जाणून घेऊयात.

धर्मेंद्र यांचा खरा वारस कोण? 450 कोटींच्या प्रॉपर्टीमधील सर्वात जास्त हिस्सा 6 जणांपैकी या मुलाला मिळणार, कायदा काय सांगतो?
Dharmendra's 450 Cr Property, Who Inherits, Legal Rights of All 6 ChildrenImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 08, 2025 | 12:22 PM
Share

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे 4 नोव्हेंबर रोजी निधन झाले. आज, 8 डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांचा वाढदिवस आहे. सर्वांना नक्कची त्यांची आठवण आहे. धर्मेंद्र यांना कधीही विसरणं त्यांच्या चाहत्यांसाठी तसेच बॉलिवूडसाठी शक्य नाही. ते कायम सर्वांच्या हृदयात असतील. सर्वांनाच माहित आहे की धर्मेंद्र हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत राहिले आहेत. धर्मेंद्र यांनी दोनदा लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आणि दुसऱ्या पत्नीचे नाव हेमा मालिनी जे की सर्वांनाच माहित आहे. धर्मेंद्र यांना दोन्ही पत्नींपासून सहा मुले आहेत. त्यांना पहिल्या पत्नीपासून चार मुले आहेत. या चार मुलांची नावे सनी देओल, बॉबी देओल, अजिता देओल आणि विजेता देओल अशी आहेत. धर्मेंद्र यांना त्यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनीपासून दोन मुली आहेत. त्यांची नावे ईशा देओल आणि अहाना देओल आहेत. तर धर्मेंद्र यांना 13 नातवंडे आहेत.

धर्मेंद्र यांच्या मालमत्तेची यादी खूप मोठी आहे

दरम्यान धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 450 कोटी रुपये आहे. त्यांच्या मालमत्तेची यादीही खूप मोठी आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, ते ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यवसाय गुंतवणुकीतून पैसे कमवत असत. त्यांच्याकडे मुंबईत एक आलिशान बंगला आणि खंडाळा आणि लोणावळा येथे फार्महाऊस आहेत. त्यांच्याकडे इतर अनेक रिअल इस्टेट प्रॉपर्टीज देखील आहेत. ते “गरम-धर्म” ही प्रसिद्ध रेस्टॉरंट चेन देखील आहे. त्यांचे हे रेस्टॉरंट अनेक शहरांमध्ये प्रसिद्ध आहेत. धर्मेंद्र यांच्याकडे मर्सिडीज-बेंझ एस-क्लास आणि लँड रोव्हर रेंज रोव्हरसह अनेक आलिशान कार देखील आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की जर धर्मेंद्र यांच्या मालमत्तेचे विभाजन झाले तर तिचा योग्य मालक कोण असेल? धर्मेंद्र यांच्या एकूण संपत्तीबद्दल आणि त्यांच्या मालमत्तेवर सर्वात जास्त हक्क कोणाकडे आहेत याबद्दल जाणून घेऊया. कायदा काय सांगतो?

मालमत्तेच्या विभाजनाबद्दल कायदा काय म्हणतो?

यावर दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील कमलेश कुमार मिश्रा यांनी एका चॅनलला दिलेल्या माहितीनुसार 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निर्णयाने – रेवणसिद्धप्पा विरुद्ध मल्लिकार्जुन (2023 INSC 783) हे संपूर्ण प्रकरण अगदी स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय म्हणतो?

2023 च्या निकालानुसार, जर एखाद्या व्यक्तीचा दुसरा विवाह हिंदू विवाह कायदा अंतर्गत अमान्य मानला गेला आहे जसे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे लग्न. कारण पहिली पत्नी प्रकाश कौर जिवंत असताना आणि त्यांच्याशी घटस्फोट झालेला नसताना दुसर लग्न करणे. पण दुसऱ्या लग्नातून जन्मलेली मुले मात्र कायद्याच्या दृष्टीने प्रॉपर्टीसाठी वैध मानली जातात. कलम 16(1) अंतर्गत, अशा मुलांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेवर पूर्ण अधिकार असतील. तथापि, हा अधिकार फक्त पालकांच्या मालमत्तेपुरता मर्यादित असेल. म्हणजेच, त्यांना संपूर्ण संयुक्त कुटुंब किंवा वडिलोपार्जित मालमत्तेवर थेट अधिकार राहणार नाहीत.

तर ईशा आणि अहानाला हिस्सा मिळेल का?

कमलेश कुमार मिश्रा यांच्या मते, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की “दुसऱ्या लग्नापासून झालेली मुले” त्यांच्या वडिलांच्या स्व-अर्जित आणि वडिलोपार्जित मालमत्तेत त्यांचा वाटा मिळण्याचा हक्कदार आहेत. कायदेशीर भाषेत, याला “कल्पित विभाजन” म्हणतात. याचा अर्थ धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर, त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता विभागली जाईल आणि धर्मेंद्र यांच्या नावावर असलेला वाटा त्याच्या सर्व कायदेशीर वारसांमध्ये समान प्रमाणात विभागला जाईल.

ईशा देओल आणि अहाना देओल यांची कायदेशीर स्थिती

कायदेशीर मान्यता: हिंदू विवाह कायद्यानुसार हेमा मालिनी यांच्याशी त्यांचे दुसरे लग्न रद्द मानले गेले असले तरी HMA च्या कलम 16(1) नुसार धर्मेंद्र यांच्या मुलींना त्यांच्या पालकांच्या संबंधात कायदेशीर मुलांचा दर्जा मिळतो.

धर्मेंद्र यांच्या मालमत्तेवर कोणाचा हक्क असेल?

त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि त्यांची मुले: सनी, बॉबी, अजिता आणि विजेता, आणि त्यांची दुसरी पत्नी, हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली ईशा देओल आणि अहाना देओल, हे सर्व धर्मेंद्र यांच्या वारशाचे समान वारस मानले जातील.

हेमा मालिनी यांना मालमत्तेत कोणताही वाटा मिळणार नाही

हेमा मालिनी यांना मात्र धर्मेंद्र यांच्या मालमत्तेत वाटा मिळणार नाही कारण त्यांचे लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार वैध मानले जात नाही. धर्मेंद्र यांनी मृत्युपत्र करून हिस्सा दिल्यास किंवा लग्नाची वैधता न्यायालयात सिद्ध झाल्यासच हेमा मालिनी यांना वाटा मिळू शकतो.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.