Smriti Mandhanna: स्मृती मानधना-पलाशचं लग्न मोडलं; या प्रकरणात रुपाली पाटील ठोंबरेंची एण्ट्री
Smriti Mandhanna: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार-गायक पलाश मुच्छल यांचे नियोजित लग्न रद्द झाले आहे. दोघांनीही स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट टाकून याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. आता या प्रकरणात रुपाली ठोंबरे यांची एण्ट्री झाली आहे.

गेल्या काही दिवसांसानू भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना ही चर्चेत आहे. लग्नाच्या काही तास आधी स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना सांगलीमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर स्मृती आणि पलाशचे लग्न पुढे ढकलल्याचे बोलले जात होते. आता मात्र, स्मृतीने थेट लग्न मोडल्याची घोषणा केली आहे. तिचा या घोषणेमुळे अनेकांना धक्का बसला. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात आता रुपाली पाटील-ठोंबरे यांची एन्ट्री झाली आहे.
स्मृतीने लग्न मोडल्याच्या बातमीने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली असून, लग्न का मोडले याबाबत विविध अफवा आणि तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र या सगळ्या गोंधळात महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या तथा राजकीय नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर एक संयमी आणि संवेदनशील पोस्ट लिहिली आहे.
काय म्हणाल्या रुपाली पाटील?
रुपाली पाटील यांनी फेसुबकवर पोस्ट करत लिहिले की, “खेळाडू स्मृती आणि पालाशचे लग्न रद्द झाले हे स्वतः स्मृतीने जाहीर केले आहे. हे त्यांचे पूर्णपणे खाजगी आयुष्य आहे आणि ते खाजगीच राहिले पाहिजे. सोशल मीडियावरील जागरूक बंधू-भगिनी, मित्र-मैत्रिणींनी हा विषय येथेच थांबवावा, ही भारतीय विजेत्या स्मृतीचीही विनंती आहे. सुज्ञ आणि सुशिक्षित नागरिक म्हणून आपण स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पुढे बोलणे थांबवूया. स्वातंत्र्याचा गैरवापर न करता, आपण स्वतःपासून सुरुवात करूया आणि विकृत मानसिकतेच्या लोकांपासून सोशल मीडिया सुरक्षित करूया.”
काय होती स्मृतीच पोस्ट?
दरम्यान, स्मृती मानधनाने स्वतः इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले, “गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप अफवा आणि चर्चा सुरू आहेत. मी नेहमी खाजगी स्वभावाची आहे, तरीही मला स्वतः याबाबत बोलावेसे वाटते. होय, लग्न रद्द झाले आहे. हा विषय आता येथेच संपवावा, अशी माझी आणि माझ्या दोन्ही कुटुंबांची विनंती आहे. सध्या आम्हाला थोडी गोपनीयता आणि वेळ हवी आहे, जेणेकरून आम्ही स्वतःच्या पद्धतीने हे सगळे समजून घेऊन पुढे जाऊ शकू. तुम्हा सर्वांची साथ नेहमीप्रमाणे अपेक्षित आहे.”
