POCO M3 5G स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर, शानदार कॅमेरासह जबरदस्त फीचर्स मिळणार

| Updated on: Apr 30, 2021 | 4:58 PM

नुकत्याच समोर आलेल्या काही लीक्सनुसार पोको (Poco) कंपनी पोको एम 3 प्रो 5 जी (Poco M3 Pro 5G) हा स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे.

POCO M3 5G स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर, शानदार कॅमेरासह जबरदस्त फीचर्स मिळणार
POCO M3 Pro 5G
Follow us on

मुंबई : पोको (Poco) कंपनी लवकरच भारतात 5G- इनेबल टेक्नोलॉजीवाला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. याबद्दलच्या काही लीक्सनुसार कंपनी पोको एम 3 प्रो 5 जी (Poco M3 Pro 5G) हा स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन Redmi Note 10 5G चं रिब्रँडेड व्हर्जन असेल. असं म्हटलं जात आहे की, लवकच हा 5 जी स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. दरम्यान, नुकताच हा फोन थायलंडच्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर पाहायला मिळाला. (POCO M3 5G smartphone will be launched soon with awesome features and great Camera)

Redmi Note 10 5G स्मार्टफोन मार्चमध्ये जागतिक बाजारात लाँच करण्यात आला होता. या फोनचा मॉडेल नंबर M2103K19G आहे. नुकत्याच आलेल्या अहवालात असे समोर आले आहे की, त्याचे भारतीय व्हेरिएंट M2013K19I मॉडेल नंबरसह POCO M3 5G च्या रूपात लाँच केलं जाईल.

या डिव्हाइसचे नुकतेच U.S., SIRIM, FCC सारख्या ऑफिशियल्सनी मलेशियामध्ये सर्टिफिकेशन केलं आहे. इतकंच नव्हे तर या पोको फोनने थायलंडच्या नॅशनल ब्रॉडकास्टिंग अँड टेलिकम्युनिकेशन कमिशन (NBTC) कडून प्रमाणपत्रही पास केले आहे. POCO M3 Pro 5G च्या NBTC प्रमाणपत्रातून त्याच्या फीचर्सविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तथापि, फोनच्या एफसीसी प्रमाणपत्रानुसार अशी माहिती मिळाली आहे की, या फोनचे स्पेसिफेकशन्स रेडमी नोट 10 5 जी सारखे असतील. POCO M3 हे डिव्हाईस थोडं मोठं असेल. तसेच यामध्ये एक जबरदस्त कॅमेरा मॉड्यूल मिळेल.

POCO M3 Pro 5G स्पेसिफिकेशन (अंदाजे)

POCO M3 Pro 5G मध्ये 6.5 इंचांचा AMOLED डिस्प्ले मिळेल, ज्यात पंच-होल डिझाईन दिलं जाईल. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि फुल एचडी + रिजॉल्यूशन देईल. यामध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो. हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरासह सादर केला जाईल. तर याच्या रियर पॅनलवर f / 1.8 अपर्चर, 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेंसरसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

33W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी

असं म्हटलं जातंय की, POCO M3 Pro 5G मध्ये फुल डेंसिटी 700 चिपसेट असेल. त्यामुळे हा 5 जी-स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये सादर केला जाईल. हा फोन 6 जीबीपर्यंतचा एलपीडीडीआर 4 एक्स रॅम आणि 128 जीबीपर्यंतच्या यूएफएस 2.2 स्टोरेजने सुसज्ज असेल. यामध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते.

इतर बातम्या 

64MP कॅमेरासह Redmi चा पहिला गेमिंग स्मार्टफोन लाँच, किंमत…

8GB/128GB, 48MP क्वाड कॅम, 5000mAh बॅटरी, Samsung चा किफायतशीर 5G स्मार्टफोन लाँच

6000mAh बॅटरी, 108MP कॅमेरा, Moto G60 आणि Moto G40 चा सेल सुरु

(POCO M3 5G smartphone will be launched soon with awesome features and great Camera)