AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6000mAh बॅटरी, 108MP कॅमेरा, Moto G60 आणि Moto G40 चा सेल सुरु

मोटोरोलाने (Motorola) गेल्या आठवड्यात भारतात मोटो जी 60 (Moto G60) आणि मोटो जी 40 (Moto G40) हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले होते.

6000mAh बॅटरी, 108MP कॅमेरा, Moto G60 आणि Moto G40 चा सेल सुरु
Moto G60, Moto G40
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 28, 2021 | 10:27 AM
Share

मुंबई : मोटोरोलाने (Motorola) गेल्या आठवड्यात भारतात मोटो जी 60 (Moto G60) आणि मोटो जी 40 (Moto G40) हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे दोन्ही बहुप्रतीक्षित स्मार्टफोन उत्कृष्ट कॅमेरा स्पेसिफिकेशन, शक्तिशाली प्रोसेसर, मोठा डिस्प्ले आणि शानदार डिझाइनसह सादर करण्यात आले आहेत. मोटो जी 60 आणि मोटो जी 40 या दोन्ही स्मार्टफोन्समधील बहुतेक फीचर्स हे सारखेच आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये केवळ कॅमेराचा फरक आहे. (Moto G60 and Moto G40 Fusion sale on, smartphone with 6000mAh battery and 108MP Camera)

गेल्या काही महिन्यांपासून मोटोरोला कंपनी एकामागोमाग एक बजेट फोन बाजारात दाखल करत आहे. परंतु मोटो जी 60 आणि मोटो जी 40 फ्यूजनसह मोटोरोलाने मिड-रेंज सेगमेंटला लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे मोटो जी 60 आणि मोटो एफ 40 (Moto F40) फ्यूजन प्रामुख्याने भारतासाठी तयार केले गेले आहेत. भारत हा पहिला देश आहे, जिथे मोटोरोलाने अधिकृतपणे मोटो जी 60 आणि मोटो जी 40 फ्यूजन हे स्मार्टफोन्स तयार केले आहेत, तसेच लाँचदेखील केले आहेत.

Moto G60 आणि Moto G40 फ्यूजनमध्ये काय आहे खास?

Moto G60 मध्ये HDR10 सह 6.80 इंचाची मॅक्स व्हिजन एफएचडी + डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz हाय रीफ्रेश रेटसह सादर करण्यात आला आहे. मोटो जी 60 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 1 टीबी पर्यंत वाढवता येते. टर्बो पॉवर 20 चार्ज सपोर्टसह 6000 एमएएच बॅटरीसह हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे.

मोटो जी 40 फ्यूजनमध्ये मोटो जी 60 सारखेच फीचर्स देण्यात आले आहेत. तथापि, दोन स्मार्टफोनमधील कॅमेरे वेगवेगळे आहेत. मोटो जी 60 मध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत ट्रिपल कॅमेरा सेटअपही देण्यात आला आहे. तर मोटो जी 40 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे परंतु त्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. दोन्ही स्मार्टफोन मोबाइल सेफ्टीसाठी थिंकशील्ड तंत्रज्ञानासह येतात आणि अँड्रॉइड 11 वर चालतात. मोटो जी 60 मध्ये क्वाड-पिक्सल टेक्नोलॉजीसह 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto G60 आणि Moto G40 Fusion ची किंमत

मोटो जी 60 चं 6 जीबी व्हेरिएंट भारतात 17,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आलं आहे. आजपासून या स्मार्टफोनची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे. मोटो जी 60 हा स्मार्टफोन आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड किंवा क्रेडीट आणि डेबिट कार्ड ईएमआयवर खरेदी केला तर ग्राहकांना या फोनवर 1500 रुपयांची सूट मिळेल.

Moto G40 फ्यूजन च्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर या फोनच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. दोन्ही फोनवर ICICI बँक कार्डवर 1000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

इतर बातम्या

खास गेमर्ससाठी डिझाईन केलेल्या iQoo 7 स्मार्टफोनवर 4000 रुपयांचा डिस्काऊंट

स्नॅपड्रॅगन 888 SoC आणि आत्तापर्यंतच्या बेस्ट कॅमेरासह Mi 11 Ultra लाँच, किंमत…

सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, 8GB/128GB स्टोरेजसह ढासू फीचर्स मिळणार

(Moto G60 and Moto G40 Fusion sale on, smartphone with 6000mAh battery and 108MP Camera)

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!