AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8GB/128GB, 48MP क्वाड कॅम, 5000mAh बॅटरी, Samsung चा किफायतशीर 5G स्मार्टफोन लाँच

सॅमसंग गॅलेक्सी M42 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल झाला आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G SoC आणि क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

8GB/128GB, 48MP क्वाड कॅम, 5000mAh बॅटरी, Samsung चा किफायतशीर 5G स्मार्टफोन लाँच
Samsung Galaxy M42 5g
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 28, 2021 | 5:54 PM
Share

मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी M42 5G (Samsung Galaxy M42 5G) स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल झाला आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G SoC आणि क्वाड कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. या फोनच्या डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच स्टाईलचा समावेश आहे. हा सॅमसंग फोन अमेझॉन आणि सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. (Samsung Galaxy M42 5G With Quad Rear Camera, 5,000mAh Battery Launched in India, know Price, Specifications)

हा फोन भारतात 21,999 रुपये या किंमतीसह लाँच केला आहे. या किंमतीत तुम्हाला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस असलेलं व्हेरिएंट मिळेल. तर या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसाठी तुम्हाला 23,999 रुपये मोजावे लागतील. सध्या आपण हा फोनचं 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर 8 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज असलेले मॉडेल 1 मे पासून अमेझॉनवर तसेच सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.

फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी M42 5G अँड्रॉयड 11 आधारित UI 3.1 वर चालतो. यामध्ये 6.6 इंचांचा HD+ सुपर एमोलेड इन्फिनिटी यू डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G SoC प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. या फोनमधील स्टोरेज स्पेस तुम्ही मायक्रो एसडी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत वाढवू शकता.

या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. कॅमेर्‍यामध्ये, आपल्याला सिंगल टेक, नाईट मोड, हायपरलॅप्स, सुपर स्लो मोशन, सीन ऑप्टिमाइझर, फ्लो डिटेक्शन यांसारखे बरेच फीचर्स मिळतील. या फोनचा फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सलचा आहे.

दमदार बॅटरी

सॅमसंग गॅलेक्सी M42 5G मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन 36 तासांचा टॉकटाइम, 22 तास इंटरनेट ब्राऊझिंग आणि सिंगल चार्जवर 34 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक प्रदान करतो.

इतर बातम्या

स्नॅपड्रॅगन 888 SoC आणि आत्तापर्यंतच्या बेस्ट कॅमेरासह Mi 11 Ultra लाँच, किंमत…

सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, 8GB/128GB स्टोरेजसह ढासू फीचर्स मिळणार

चार कॅमेरे, 5000mAh बॅटरी, किंमत फक्त 9,499 रुपये, POCO चा नवा स्मार्टफोन लाँच

(Samsung Galaxy M42 5G With Quad Rear Camera, 5,000mAh Battery Launched in India, know Price, Specifications)

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...