चार कॅमेरे, 5000mAh बॅटरी, किंमत फक्त 9,499 रुपये, POCO चा नवा स्मार्टफोन लाँच

कंपनीने Poco M2 Reloaded हा स्मार्टफोन 4GB रॅमसह लाँच केला आहे आणि या स्मार्टफोनमध्ये 64GB इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे.

चार कॅमेरे, 5000mAh बॅटरी, किंमत फक्त 9,499 रुपये, POCO चा नवा स्मार्टफोन लाँच
Poco M2
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 10:37 PM

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी Poco India ने Poco M2 Reloaded स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा फोन MediaTek Helio G80 octa-core प्रोसेसर आणि 9499 रुपये या किंमतीसह लाँच केला आहे. हा फोन Poco M2 चं नवं व्हेरिएंट आहे. सध्या Poco M2 स्मार्टफोन 6GB RAM प्लस 64GB आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसह उपलब्ध आहे. (Poco M2 reloaded launched in India with quad camera setup and 5000 mAh battery)

कंपनीने Poco M2 Reloaded हा स्मार्टफोन 4GB रॅमसह लाँच केला आहे आणि या स्मार्टफोनमध्ये 64GB इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. या फोनची किंमत 9,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. आजपासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार तुम्ही अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे या फोनसाठी पेमेंट केलंत तर तुम्हाला या फोनवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच नो कॉस्ट ईएमआयची सुरुवात 1,584 रुपये प्रति महिना या किंमतीत हा फोन तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता.

फीचर्स

या फोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे जो 2340 × 1080 पिक्सल रिझोल्यूशनसह येतो. हा डिस्प्ले टॉपवर 2.5D ग्लास लेयर्ड आहे. याशिवाय हा फोन मीडियाटेक हेलिओ जी 80 ऑक्टा-कोर प्रोसेसरने (MediaTek Helio G80 octa-core) सुसज्ज आहे आणि हा Android 10 वर आधारित MIUI 11 वर चालतो. यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W चार्जरसह येते. हा फोन 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

क्वाड कॅमेरा सेटअप

या फोनच्या कॅमेर्‍याविषयी सांगायचे झाल्यास Poco M2 स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा सेन्सर, 5 मेगापिक्सलचा सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.

हा फोन ब्रिक रेड, स्लेट ब्लू आणि पिच ब्लॅक कलर ऑप्शन्ससह सादर केला जाईल. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये डुअल सिम सपोर्ट, ब्लूटूथ 5.0, 802.11 a/b/g/n/ac, 2.4G/5G, USB type-C आणि 3.5mm ऑडिओ जॅक मिळेल.

इतर बातम्या

6000mAh बँटरी, 108MP कॅमेरासह Moto G60 आणि Moto G40 लाँच, किंमत…

6GB/128GB, क्वाड कॅमेरासह POCO M2 Reloaded बाजारात, उरले फक्त काही तास

3GB/64GB, 6,999 रुपयात खरेदी करा 6000 mAh बॅटरीवाला फोन, अमेझॉनवर पहिला सेल

(Poco M2 reloaded launched in India with quad camera setup and 5000 mAh battery)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.