6GB/128GB, क्वाड कॅमेरासह POCO M2 Reloaded बाजारात, उरले फक्त काही तास

पोको इंडिया येत्या दोन दिवसांत आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनचे नाव पोको एम 2 रिलोडेड (POCO M2 Reloaded) असे आहे.

6GB/128GB, क्वाड कॅमेरासह POCO M2 Reloaded बाजारात, उरले फक्त काही तास
Poco M2
अक्षय चोरगे

|

Apr 19, 2021 | 5:55 PM

मुंबई : पोको इंडिया (Poco India) येत्या दोन दिवसांत आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनचे नाव पोको एम 2 रिलोडेड (POCO M2 Reloaded) असे आहे. हा फोन पोको एम 2 (POCO M2) चं नवं व्हेरिएंट आहे. या फोनसाठी कंपनीने फ्लिपकार्टवर एक मायक्रोसाईट बनवली आहे. त्यानुसार 21 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता हा फोन लाँच केला जाईल आणि त्याच दिवशी त्याचा सेलदेखील सुरू होईल. (Poco M2 Reloaded launching in India on April 21, check specification and feature)

या फोनच्या फीचर्सविषयी सांगायचे तर फ्लिपकार्टच्या मायक्रोसाईटवर याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु ऑनलाईन रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, कंपनी आपला जुना फोन पुन्हा नव्याने लाँच करणार आहे, परंतु यात फक्त रॅमचा पर्याय वेगळा आहे.

Poco M2 दोन स्टोरेज मॉडेल्ससह येतो, ज्यात 6 जीबी रॅम प्ल्स 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेज असे दोन पर्याय आहेत. तथापि, Poco M2 चं 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज मॉडेल पोको इंडियाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध करण्यात आलं आहे, जे या आठवड्यात लाँच केलं जाऊ शकतं.

Poco M2 स्मार्टफोनचे फीचर्स

या फोनच्या इतर फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, Poco M2 मध्ये 6.53 इंचांचा एफएचडी + आयपीएस डिस्प्ले आहे जो 2340 × 1080 पिक्सलच्या रिजोल्यूशनसह येतो. डिव्हाइस मीडियाटेक हेलिओ जी 80 एसओसी (MediaTek Helio G80 SoC) प्रोसेसर सपोर्टेड आहे. यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W चार्जरसह येते. हा फोन 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

क्वाड कॅमेरा सेटअप

या फोनच्या कॅमेर्‍याविषयी सांगायचे झाल्यास Poco M2 स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा सेन्सर, 5 मेगापिक्सलचा सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.

हा फोन ब्रिक रेड, स्लेट ब्लू आणि पिच ब्लॅक कलर ऑप्शन्ससह सादर केला जाईल. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये डुअल सिम सपोर्ट, ब्लूटूथ 5.0, 802.11 a/b/g/n/ac, 2.4G/5G, USB type-C आणि 3.5mm ऑडिओ जॅक मिळेल.

इतर बातम्या

Samsung Galaxy A22 लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास

3GB/64GB, 6,999 रुपयात खरेदी करा 6000 mAh बॅटरीवाला फोन, अमेझॉनवर पहिला सेल

लाँचिंगपूर्वीच Realme 8 5G चे फीचर्स लीक, या स्मार्टफोनमध्ये काय असेल खास?

(Poco M2 Reloaded launching in India on April 21, check specification and feature)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें