Samsung Galaxy A22 लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास

दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग Galaxy A22 स्मार्टफोन लाँच करुन आपल्या गॅलेक्सी ए सिरिजचा विस्तार करण्याच्या विचारात आहे.

Samsung Galaxy A22 लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास
Samsung Galaxy A22
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 7:57 AM

मुंबई : दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग (Samsung) 4 जी आणि 5 जी या दोन्ही एडिशनमध्ये गॅलेक्सी ए 22 (Galaxy A22) लाँच करुन आपल्या गॅलेक्सी ए सिरिजचा विस्तार करण्याच्या विचारात आहे. जीएसएम अरेनाच्या अहवालानुसार, अलीकडेच भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) वेबसाइटवर SM-A225F हा स्मार्टफोन पाहावयास मिळाला आहे. (Samsung Galaxy A22 smartphone will be launched soon, know what will be special in it)

अहवालात असे म्हटले आहे की, SM-A225F/DS फोनमध्ये ड्युअल-सिम स्पोर्ट असेल. याशिवाय या अहवालात A22 4G बाबतची इतर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच SM-A225F मॉडल नंबर HTML5 टेस्ट लिस्टिंगमध्येदेखील पाहायला मिळाला आहे. हा फोन Android 11 आऊट ऑफ द बॉक्सवर चालेल.

अलीकडेच सॅमसंगने भारतात गॅलेक्सी A52, A52 5G आणि A72 सादर केले आहेत. याबरोबरच कंपनीने असेही म्हटले आहे की, या डिव्हाईसेसमध्ये कमीत कमी किंमतीत उत्तम तंत्रज्ञानाचा अनुभव मिळेल.

नवीन Galaxy A Series सुपर AMOLED डिस्प्लेसह ऑसम व्हॉयलेट, ऑसम ब्लू, ऑसम ब्लॅक आणि ऑसम व्हाईट या कलर ऑप्शन्ससह जागतिक स्तरावर लाँच होईल. Galaxy A52 आणि A72 लवकरच भारतात लाँच केले जातील.

Galaxy A52 आणि A72 चे फीचर्स

या डिव्हाईसेसमध्ये 64 मेगापिक्सेलचा हाय रिझोल्यूशन प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. युजर्स या कॅमेरामधील 4K व्हिडीओ स्नॅप टूलच्या मदतीने 4K व्हिडीओ शूट करु शकतात. तर 8 मेगापिक्सलच्या दुसऱ्या सेंसरच्या मदतीने हाय रिझोल्यूशन इमेज क्लिक करु शकतील. Galaxy A52 मध्ये 4,500 mAh क्षमतेची बॅटरी मिळू शकते. तर A72 मध्ये 5,000 mAh क्षमतेची बॅटरी मिळेल. Galaxy A52 आणि A72 मध्ये गॅलेक्सी स्पीकर्स सहित स्टीरियो स्पीकर दिले आहेत. या फोनच्या स्टोरेज क्षमतेबद्दल सांगायचे झाल्यास या दोन्ही फोनची एक्सटर्नल मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.

लाँचिंगपूर्वीच Realme 8 5G चे फीचर्स लीक

स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme लवकरच थायलंडमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Realme 8 5G लाँच करणार आहे. हे डिव्हाईस 21 एप्रिलला लाँच करण्यात येणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. तथापि, फोन लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने या फोनचे काही फीचर्स टीझ केले आहेत. रियलमी थायलंडने आपल्या सोशल मीडिया चॅनेलवर फोनचा टीझर शेअर केला आहे. या शेअर केलेल्या टीझरमध्ये हा स्मार्टफोन 6.5 इंचांच्या पंच होल डिस्प्लेसह येणार असून यात 90Hz चा रिफ्रेश रेट मिळेल, अशी माहिती कंपनीनकडून देण्यात आली आहे. या टीझरमध्ये असेही म्हटले आहे की, या स्मार्टफोनमध्ये डाव्या बाजूला सिम कार्ड ट्रे देण्यात येणार आहेत.

दुसर्‍या टीझरमध्ये असे म्हटले आहे आहे की, Realme 8 5G स्मार्टफोन 8.5mm पातळ असेल आणि त्याचे वजन 185 ग्रॅम इतकं असेल. हा स्मार्टफोन साइड-माऊंट फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल जो उजव्या बाजूला दिला जाईल. यासह, या फोनच्या खालच्या बाजूला 3.5mm हेडफोन जॅक असेल. टीझरमध्ये दिलेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळेल आणि यात ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 700 5G (octa-core MediaTek Dimensity 700 5G) प्रोसेसर असेल. हा फोन सुपरसॉनिक ब्लॅक आणि सुपरसॉनिक ब्लू कलर ऑप्शन्समध्ये येईल.

इतर बातम्या

Flagship Fest Sale : Iphone 11, Motorola Razr 5G सह Vivo-Oppo च्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट

8GB RAM, 48MP कॅमेरा, अवघ्या 849 रुपयांत खरेदी करा 5G स्मार्टफोन

(Samsung Galaxy A22 smartphone will be launched soon, know what will be special in it)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.