AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8GB RAM, 48MP कॅमेरा, अवघ्या 849 रुपयांत खरेदी करा 5G स्मार्टफोन

फ्लिपकार्टने (Flipkart) Realme Narzo 30 Pro 5G हा स्मार्टफोन अवघ्या 849 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी दिली आहे.

8GB RAM, 48MP कॅमेरा, अवघ्या 849 रुपयांत खरेदी करा 5G स्मार्टफोन
Realme Narzo 30 Pro 5g
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 12, 2021 | 3:52 PM
Share

मुंबई : Flipkart वरील स्मार्टफोन्सवर सध्या बंपर डिस्काऊंट दिला जात आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर आहे. फ्लिपकार्टने Realme Narzo 30 Pro 5G हा स्मार्टफोन अवघ्या 849 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी दिली आहे. सोबत या फोनवर कंपनीने विविध ऑफर्स देऊ केल्या आहेत. (Buy Realme Narzo 30 Pro 5G smartphone in just Rs 849 by Flipkart Exchange offer)

रियलमी नार्झो 30 प्रो 5 जी (realme Narzo 30 Pro 5G) स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. याशिवाय या स्मार्टफोनवर कंपनीकडून 16,150 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात हा फोन विकत घेत असाल तर तुम्हाला केवळ 849 रुपये मोजावे लागू शकतील.

याशिवाय तुम्ही या फोनवर स्मार्ट अपग्रेड प्लॅनची ​​ऑफरदेखील घेऊ शकता. तसेच तुमच्याकडे फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड असल्यास आणि त्याद्वारे तुम्ही हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळू शकतो. या व्यतिरिक्त या फोनची मूळ किंमत 18999 रुपये इतकी आहे. परंतु हा फोन सध्या कंपनीकडून 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. सोबतच तुम्ही Disney + Hotstar VIP चं सब्सक्रिप्शनदेखील मिळवू शकता.

फ्लिपकार्टवरुन हा फोन तुम्ही 6 GB आणि 8 GB रॅम अशा दोन वेरिएंटमध्ये खरेदी करु शकता. तसेच यामध्ये ब्लेड सिल्व्हर आणि स्वॉर्ड ब्लॅक कलर ऑप्शन्स आहे. तुम्ही जर 8 जीबी रॅम असलेलं व्हेरिएंट खरेदी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला 19,999 रुपये द्यावे लागतील. या फोनवर तुम्हाला 17,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळू शकते. या व्यतिरिक्त तुम्ही या दोन्ही स्मार्टफोनवर नो-कॉस्ट ईएमआयचा लाभ घेऊ शकता.

Realme Narzo 30 Pro चे फीचर्स

Realme Narzo 30 प्रो 5 जी कनेक्टिव्हिटी आणि 120 हर्ट्ज स्क्रीनसह सुसज्ज आहे. 5 जी साठी Narzo 30 प्रो मध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक डायमेन्शन 800 यू प्रोसेसर देण्यात आला आहे जो रियलमी एक्स 7 5जी मध्ये आहे. प्रोसेसरमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस आहे. हा स्मार्टफोन मायक्रो एसडी कार्ड सपोर्टसह सुसज्ज आहे. रियलमी Narzo 30 प्रो मध्ये 6.5 इंचाची एलसीडी स्क्रीन आहे जी 1080p रेजोल्यूशनसह येते. फोनमध्ये 405 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी आणि 600 पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे.

या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे, तर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेरामध्ये आपणास 48 मेगापिक्सल मोड, सुपर नाईटस्केप मोड, नाईट फिल्टर्स, क्रोमा बूस्ट, पॅनारॉमिक व्यू, एक्सपर्ट, टाइमलॅप्स, एचडीआर, अल्ट्रा वाइड, अल्ट्रा मॅक्रो आणि अन्य वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

फोनची बॅटरी 5000mAh क्षमतेची आहे जी 30 डार्ट फास्ट चार्जिंगसह येते. फोनमध्ये साइड माउंट केलेला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा फोन डॉल्बी एट्मॉस, Hi- Res ऑडिओ तंत्रज्ञानासह सादर करण्यात आला आहे.

इतर बातम्या

18GB रॅम, 24MP सेल्फी कॅमेरा, ‘या’ जबरदस्त स्मार्टफोनची 15 एप्रिलपासून विक्री

Samsung Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्सवर 12000 रुपयांची सूट

4GB/64GB, 13MP कॅमेरा, किंमत 10 हजारांहून कमी, Infinix चा दमदार फोन लाँचिंगसाठी सज्ज

(Buy Realme Narzo 30 Pro 5G smartphone in just Rs 849 by Flipkart Exchange offer)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?