AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4GB/64GB, 13MP कॅमेरा, किंमत 10 हजारांहून कमी, Infinix चा दमदार फोन लाँचिंगसाठी सज्ज

हाँगकाँगची स्मार्टफोन निर्माता कंपनी इनफिनिक्स (Infinix) त्यांचं नवीन डिव्हाइस भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

4GB/64GB, 13MP कॅमेरा, किंमत 10 हजारांहून कमी, Infinix चा दमदार फोन लाँचिंगसाठी सज्ज
Infinix Hot 10 Play
| Edited By: | Updated on: Apr 11, 2021 | 7:44 AM
Share

मुंबई : हाँगकाँगची स्मार्टफोन निर्माता कंपनी इनफिनिक्स (Infinix) त्यांचं नवीन डिव्हाइस भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनी 19 एप्रिल रोजी अधिकृतपणे इनफिनिक्स हॉट 10 प्ले (Infinix Hot 10 Play) डिव्हाइस भारतात अधिकृतपणे लाँच करणार आहे. या स्मार्टफोनच्या घोषणेदरम्यान इनफिनिक्सने त्याच्या किंमतीचा उल्लेख केलेला नाही. परंतु याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपये इतकी असू शकते. (Infinix Hot 10 Play to be launched in India on April 19, know price and features)

याव्यतिरिक्त, Infinix ने नमूद केले आहे की, Infinix Hot 10 Play मोरँडी ग्रीन, 7-डिग्री पर्पल, एजियन ब्लू आणि ओबसिडीयन ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केला जाईल. फिलिपिन्ससह जागतिक बाजारात इनफिनिक्स हॉट 10 प्ले यापूर्वीच लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबती सर्व माहिती यापूर्वी सर्वांसमोर आली आहे.

Infinix Hot 10 Play के स्पेसिफिकेशन्स

  • Infinix Hot 10 Play मध्ये मागील बाजूस आयताकृती कॅमेरा मॉड्यूलमध्ये ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे. या व्यतिरिक्त त्यामध्ये कॅपेसिटिव्ह फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये ओस-ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • Infinix Hot 10 Play मध्ये 6.82 इंचांचा HD + IPS LCD पॅनल मिळेल, ज्याचं रिज़ॉल्यूशन 720×1640 पिक्सल इतकं आहे. हा स्मार्टफोन Mediatek हेलियो जी 35 एसओसी प्रोसेसरने सुसज्ज आहे जो 2.3Ghz वर एक ऑक्टा-कोर चिपसेट आहे.
  • हा फोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. 2GB / 4GB RAM आणि 32GB / 64GB स्टोरेज असे पर्याय यामध्ये देण्यात येतील. तसेच या फोनची स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येईल.
  • कॅमेर्‍याविषयी सांगायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये ड्युअल-कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे, तर त्याच्या सेकेंडरी कॅमेराबाबतची माहिती समोर आलेली नाही. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर असेल.

Infinix Hot 10 Play मध्ये दमदार बॅटरी

कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, Infinix Hot 10 Play मध्ये 4 जी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5 मिमी जॅक आणि मायक्रो-यूएसबीसाठी सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन 6000 एमएएच बॅटरीसह येतो, ज्यास 10W सप्लाय चार्जरचा सपोर्ट आहे. Infinix चा असा दावा आहे की, या फोनमधील बॅटरी सिंगल चार्जवर 53 तासांपर्यंतचा टॉक-टाईम देऊ शकते.

इतर बातम्या

Flipkart Mobile Bonanza Sale : Asus ROG Phone 3 वर तब्बल 8000 रुपयांचा डिस्काऊंट

Mobile Bonanza Sale : ‘या’ 10 स्मार्टफोन्सवर तब्बल 8000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

(Infinix Hot 10 Play to be launched in India on April 19, know price and features)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.