Samsung Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्सवर 12000 रुपयांची सूट

सॅमसंगने या वर्षाच्या सुरुवातीला Galaxy Unpacked 2021 इव्हेंटमध्ये मच-अवेटेड Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्स लाँच केले होते.

Samsung Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्सवर 12000 रुपयांची सूट
Samsung Galaxy S21
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 9:07 AM

मुंबई : सॅमसंगने या वर्षाच्या सुरुवातीला Galaxy Unpacked 2021 इव्हेंटमध्ये मच-अवेटेड Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्स लाँच केले होते. यामध्ये Galaxy S21, Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. हे स्मार्टफोन्स रेक्टँग्युलर कॅमेरा मॉड्यूल आणि ट्रिपल कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सची जगभरात जोरदार विक्री सुरु आहे. अशातच कंपनीने आता या स्मार्टफोन्सवर विविध ऑफर्स सादर केल्या आहेत. (Get Rs 12000 cashback on Samsung Galaxy S21 plus in India)

सॅमसंग गॅलेक्सी एस 21 + वर 5000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनवर 7000 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. गॅलेक्सी एस 21 सिरीजमधील स्मार्टफोन 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनसवर विकले जात आहेत. युजर्सना गॅलेक्सी S21+ सह गॅलेक्सी वॉच अॅक्टिव्ह 2 किंवा गॅलेक्सी बड्स प्रोवर सूट देण्यात आली आहे.

सॅमसंगने गुरुवारी घोषणा केली आहे की, ग्राहक जर गॅलेक्सी एस 21 + 76,999 रुपये इतक्या किंमतीत विकत घेत असतील तर त्यांना 5000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक दिला जाईल. सॅमसंग ऑनलाइन स्टोअर, एक्सक्लुझिव्ह स्टोअर तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरच्या माध्यमातून या स्मार्टफोनची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 7000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळू शकेल. गॅलेक्सी एस 21 + सॅमसंगच्या वेबसाइटवर 76,999 रुपयांना विकला जात आहे. कॅशबॅकनंतर या फोनची किंमत 64,999 रुपये इतकी होईल.

कशी आहे Samsung Galaxy S21 सिरीज?

सॅमसंग Galaxy S21 सिरीजमध्ये Exynos 2100 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. असा दावा करण्यात आला आहे की, यामधील 5G इंटिग्रेटेड मोबाईल प्रोसेसर दुसऱ्या प्रोसेसर्सच्या तुलनेत सर्वात फास्ट आहे. हे तिन्ही फोन 5 जी टेक्नोलॉजीला सपोर्ट करतात. Galaxy S21 तीन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. तर Galaxy S21+ चार कलर वेरियंटसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अंड्रॉयड 11 वर बेस्ड आहेत. तसेच हे फोन One UI 3.1 वर काम करतील. यामध्ये डुअल सिम (नॅनो) सपोर्ट देण्यात आला आहे.

गॅलेक्सी एस 21 मध्ये 6.2 इंचांचा फुल-एचडी+ इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याची पिक्सेल डेन्सिटी 421ppi इतकी आहे. याचा पॅनल फ्रंट कॅमेरासाठी एक पंच-होलचं काम करतो. गॅलेक्सी S21+ थोडा मोठा आहे. याचा डिस्प्ले 6.7 इंचांचा आहे. या डिस्प्लेची पिक्सेल डेन्सिटी 394ppi इतकी आहे. गॅलेक्सी S21 अल्ट्रा हा स्मार्टफोन S21 आणि S21+ या दोन्ही फोन्सपेक्षा मोठा आहे. या फोनच्या डिस्प्लेची पिक्सेल डेन्सिटी 515ppi इतकी असून डिस्प्ले 6.8 इंचांचा आहे. गॅलेक्सी एस 21 अल्ट्राचा डिस्प्ले गॅलेक्सी नोट सिरीजच्या एस पेनला सपोर्ट करतो.

शानदार कॅमेरा आणि बॅटरी

या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास S21 आणि S21+ ममध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64-मेगापिक्सलचा आहे, सेकेंडरी कॅमरा 12-मेगापिक्सल आणि वाईड-अँगल लेन्स 12-मेगापिक्सलची आहे. यामध्ये 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. गॅलेक्सी S21 अल्ट्रामध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 108-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, सेकेंडरी कॅमरा 12 मेगापिक्सलचा आणि दोन लेन्स 10-10 मेगापिक्सलच्या देण्यात आल्या आहेत. गॅलेक्सी S21 अल्ट्रामध्ये 40-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

गॅलेक्सी S21 मध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी S21+ मध्ये 4800mAh ची तर S21 Ultra मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तिन्ही फोन 25W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात.

संबंधित बातम्या

Flipkart Mobile Bonanza Sale : Asus ROG Phone 3 वर तब्बल 8000 रुपयांचा डिस्काऊंट

Mobile Bonanza Sale : ‘या’ 10 स्मार्टफोन्सवर तब्बल 8000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.