मुंबई : Realme 8 5G हा स्मार्टफोन आज (22 एप्रिल) भारतात लाँच करण्यात आला. Realme चा हा फोन 90Hz डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे आणि त्यात ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्शन 700 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा तसेच एक होल-पंच डिस्प्ले आहे. (Realme 8 5G Smartphone Launched In India; check price and specs)
Realme 8 5G हा स्मार्टफोन Realme 8 चं अपग्रेडेड व्हर्जन आहे, जो गेल्या महिन्यात Realme 8 Pro सह भारतात लाँच झाला होता. हा स्मार्टफोन 128 जीबी पर्यंतच्या ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो आणि यात डायनॅमिक रॅम एक्सपेंशन (डीआरई) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे जो बिल्ट-इन स्टोरेजला व्हर्च्युअल रॅममध्ये रूपांतरित करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
भारतात Realme 8 5G या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. यामध्ये तुम्हाला 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट मिळेल. फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज पर्यायसुद्धा सादर करण्यात आला आहे, ज्याची किंमत 16,999 रुपये इतकी आहे. Realme 8 5G च्या कलर ऑप्शन्समध्ये सुपरसॉनिक ब्लॅक आणि सुपरसॉनिक ब्लूचा समावेश आहे. फ्लिपकार्ट, रियलमी डॉट कॉम आणि ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांमार्फत 28 एप्रिल, दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन देशात विक्रीसाठी उपलब्ध असेल.
इतर बातम्या
6000mAh बँटरी, 108MP कॅमेरासह Moto G60 आणि Moto G40 लाँच, किंमत…
6GB/128GB, क्वाड कॅमेरासह POCO M2 Reloaded बाजारात, उरले फक्त काही तास
3GB/64GB, 6,999 रुपयात खरेदी करा 6000 mAh बॅटरीवाला फोन, अमेझॉनवर पहिला सेल
(Realme 8 5G Smartphone Launched In India; check price and specs)
मुंबईतील श्रीमंतांनी, ज्यांची ज्यांची पत आणि ऐपत आहे त्यांनी तसेच खास करून आपल्या प्रिय दिल्लीश्वरांनी यावेळी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे हीच विनंती! असे शिवसेनेनं यात म्हटलं आहे.