
तुम्ही 10 ते 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन 5जी स्मार्टफोन शोधत असाल, तर या बजेटमध्ये तुमच्यासाठी एक नवीन स्मार्टफोन लाँच होणार आहे. 13 सप्टेंबर म्हणजेच उद्या रिअलमी पी3 लाईट 5जी लाँच होणार आहे, परंतु फ्लिपकार्टने अधिकृतपणे हा फोन लाँच होण्यापूर्वीच या फोनची किंमत जाहीर केली आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंगमध्ये केवळ फोनची किंमतच नाही तर फोनमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सची माहितीही देण्यात आली आहे.
हा Realme फोन अल्ट्रा लाईट (197 ग्रॅम) आणि सुपर स्लिम डिझाइन (7.94मिमी) सह येईल. तसेच रियलमी P3 लाइट 5G हा स्मार्टफोन लिली व्हाइट, पर्पल ब्लॉसम आणि मिडनाइट लिली या तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. फोनमध्ये 4 आणि 6 जीबी रॅम पर्याय आहेत परंतु 6 जीबी रॅम पर्यायासह यामध्ये रॅम 18 जीबीपर्यंत वाढवता येते. याचा अर्थ असा की हा बजेट फोन 12 जीबी व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करेल.
फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, या फोनचा 4 जीबी / 128 जीबी व्हेरिएंट 12,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. याशिवाय या हँडसेटचा 6 जीबी / 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.
फ्लिपकार्टवरील लिस्टिंगनुसार हा Realme फोन स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. याशिवाय, या हँडसेटमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले आहे जो 120 Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल, तुम्हाला हा फोन 120 Hz टच सॅम्पलिंग रेटसह मिळेल.
डिस्प्ले आणि प्रोसेसर व्यतिरिक्त, या फोनमध्ये 45 वॅट फास्ट चार्ज सपोर्टसह 6000 एमएएचची पॉवरफुल बॅटरी असेल. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, फोनच्या मागील बाजूस 32 मेगापिक्सेल कॅमेरा आणि समोर 8 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर असेल.
हा फोन ड्युअल माइक नॉइज कॅन्सलेशन आणि हाय रिझोल्यूशन ऑडिओ सर्टिफिकेशनसह येईल. इतर स्मार्टफोन्सप्रमाणे या फोनमध्ये एआय स्मार्ट लूप, सर्च टू सर्च आणि गुगल जेमिनी सारखे एआय फीचर्स देखील आहेत.