8000mAh बॅटरी असलेला फोन लाँच, ओप्पो-सॅमसंगशी करणार स्पर्धा
रियलमीने 25 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये रियलमी नारझो 100x 5G लाँच केला आहे. हा नवीन फोन कंपनीच्या वेबसाइटवर तसेच ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. चला तर मग रियलमीच्या या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

तुम्हालाही मिंड रेंजपर्यंत नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर रियलमी कंपनीने 25 हजार रूपयांपर्यंतच्या बजेटमध्ये नवीन फोन रियलमी नारझो 100x 5G भारतात लाँच केला आहे. कंपनीच्या नारझो सिरीजमधील हा नवीन फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असून, यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 256GB पर्यंत स्टोरेज, 50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 8,000mAh बॅटरी ही वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फिचर्स तसेच हा फोन कधी उपलब्ध होईल ते जाणून घेऊयात.
भारतात रियलमी नार्झो 100x 5G ची किंमत
या रियलमी स्मार्टफोनची किंमत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 20 हजार 999 रूपये आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 22 हजार 999 रूपये आणि 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 24 हजार 999 रूपये आहे. हा फोन मिडनाईट ब्लॅक आणि फ्लॅश ऑरेंज रंगांमध्ये उपलब्ध आहे. याची स्पर्धा ओप्पो के14 5G, मोटोरोला जी67 पॉवर 5G, आणि सॅमसंग गॅलेक्सी एफ36 5G सारख्या स्मार्टफोन्सशी आहे.
प्रास्ताविक ऑफरचा भाग म्हणून सर्व व्हेरिएंटवर 500 रूपयांचे कूपन सवलत आणि 2 हजार रूपयांची सर्वसाधारण सवलत मिळेल. ज्यामुळे तुम्ही ऑफरचा लाभ घेतल्यानंतर सुरुवातीचा व्हेरिएंट हा 18 हजार 499 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. ग्राहक सहा महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट EMI पर्यायांचा लाभ देखील घेऊ शकतात. हा फोन 22 जुलै रोजी कंपनीच्या वेबसाइट आणि ॲमेझॉनद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होईल.
रियलमी नार्झो 100x 5G स्पेसिफिकेशन्स
ओएस: हा ड्युअल-सिम रियलमी फोन अँड्रॉइड 7.0 वर आधारित रियलमी UI 16 वर चालतो.
स्क्रीन: या डिव्हाइसमध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट असलेला 6.8-इंचाचा HD+ LCD पॅनल आहे. हा फोन हाय ब्राइटनेस मोडमध्ये (HBM) 1200 nits पर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कंपनीने पांडा-1681 ग्लासचा वापर केला आहे.
चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, ARM Mali-G57 MC2 GPU सह MediaTek Dimensity 6300 ऑक्टा-कोर प्रोसेसर वापरला आहे. या फोनमध्ये एअरफ्लो व्हेपर कूलिंग चेंबर आहे.
कॅमेरा: या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून, त्यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये अनेक एआय (AI) फीचर्ससुद्धा आहेत, ज्यात नोट्ससाठी एआय असिस्टंट, एआय इरेझर, एआय-पॉवर्ड पोर्ट्रेट लायटिंग आणि एआय प्लस लाइट फीचर यांचा समावेश आहे.
कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सपोर्ट आहे. यात 5G, Wi-Fi 5, ब्लूटूथ 5.3, GPS, एक USB टाइप-C पोर्ट आणि GLONASS चा सपोर्ट आहे.
बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी एक पॉवरफूल 8000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W सुपरVOOC फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.