6GB+128GB, 50MP कॅमेरासह Redmi चा किफायतशीर स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज

| Updated on: Aug 19, 2021 | 6:04 PM

शाओमीने (Xiaomi) आपला रेडमी 10 बजेट स्मार्टफोन ग्लोबली लॉन्च केला आहे. नवीन रेडमी 10 एक नवीन चिपसेट, एक चांगला कॅमेरा सेटअप आणि बऱ्याच दमदार फीचर्ससह येतो.

6GB+128GB, 50MP कॅमेरासह Redmi चा किफायतशीर स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज
Follow us on

मुंबई : शाओमीने (Xiaomi) आपला रेडमी 10 बजेट स्मार्टफोन ग्लोबली लॉन्च केला आहे. नवीन रेडमी 10 एक नवीन चिपसेट, एक चांगला कॅमेरा सेटअप आणि बऱ्याच दमदार फीचर्ससह येतो. आज आम्ही तुम्हाला नवीन Xiaomi Redmi 10 बद्दल माहिती देणार आहोत. Redmi 10 6.5-इंच FHD+ डिस्प्लेसह 90Hz अॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटसह येतो, जो फोनच्या आवश्यकतेनुसार आपोआप रिफ्रेश रेट अॅडजस्ट करु शकतो, जेणेकरून तुमच्या फोनची बॅटरी वाया जाणार नाही. (Redmi 10 announced with Helio G88 chipset, 90Hz display and 50MP triple camera)

हा फोन सनलाइट डिस्प्ले आणि रीडिंग मोड 3.0 फीचर्ससह देखील येतो. फोन MediaTek Helio G88 वर काम करतो आणि तीन स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये 4GB+64GB, 4GB+128GB आणि 6GB+128GB असे पर्याय देण्यात आले आहेत. फोनची मागील बाजू क्वाड-कॅमेरा सेटअपसह येते. यात 50 MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि दोन 2MP मॅक्रो आणि डेप्थ सेन्सरचा समावेश आहे.

फीचर्स

फोनमध्ये समोरच्या बाजूला 8MP कॅमेरा आहे जो सेंटर अलाइन पंच-होल कटआउटमध्ये आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी असून 18W फास्ट चार्जिंग आणि 9W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, फोन ड्युअल स्पीकर सेटअप आणि 3.5 मिमी हेडफोन पोर्टसह देखील येतो. पॉवर बटणासह साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12.5 आहे. रेडमी 10 चे वजन 181 ग्रॅम आहे आणि त्याचं डायमेंशन 161.95 x 75.53 x 8.92 मिमी इतकं आहे.

Redmi 10 4GB+64GB, 4GB+128GB आणि 6GB+128GB ज्या किंमती अनुक्रमे 179 डॉलर्स, 199 डॉलर्स और 219 डॉलर्स अशा आहेत. हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध होईल, ज्यात कार्बन ग्रे, पेबल व्हाइट आणि सी ब्लू यांचा समावेश आहे. हे बजेट डिव्हाइस अद्याप भारतात लॉन्च केले गेले नाही, परंतु काही महिन्यांत ते भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र शाओमीने अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.

हा फोन भारतात लॉन्च झाला तर त्याची किंमत 10,000 रुपये असण्याची शक्यता आहे. बजेट डिव्हाइस मायक्रोमॅक्स नोट 1, सॅमसंग गॅलेक्सी M02s आणि रेडमीच्या स्वतःच्या नोट 9 सिरीजशी स्पर्धा करेल.

इतर बातम्या

आता iOS वापरकर्तेही खेळू शकतात बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया, डाऊनलोडसाठी गेम उपलब्ध

भारतात 5G ची मारामार, तिकडे LG कडून 6G टेस्टिंग, डेटा ट्रान्समिशन प्रक्रिया यशस्वीपणे पार

रिअलमीने लाँच केले रिअलमी जीटी स्मार्टफोन आणि स्लिम बुक लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Redmi 10 announced with Helio G88 chipset, 90Hz display and 50MP triple camera)