ऑफर्सचा धमाका… केवळ 449 रुपयांमध्ये खरेदी करा Redmi 9 Active स्मार्टफोन!

| Updated on: Jul 23, 2022 | 6:39 PM

जर तुम्ही एखादी बजेट स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. Redmi 9 Active या फोनवर केवळ काही काळासाठीच डिस्काउंट देण्यात येत असून ज्यांना त्वरित स्मार्टफोन घ्यायचा असेल अशांना स्वस्तात फोन खरेदी करण्याची उत्तम संधी यानिमित्त उपलब्ध होत आहे.

ऑफर्सचा धमाका... केवळ 449 रुपयांमध्ये खरेदी करा Redmi 9 Active स्मार्टफोन!
Redmi 9 Active
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : ई-कॉमर्स वेबसाइट ॲमेझॉनवर आजपासून प्राइम-डे सेलचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल 24 जुलैपर्यंत चालणार आहे. या सेलअंतर्गत अनेक प्रोडक्टवर भरघोस सुट देण्यात आली आहे. यात स्मार्टफोनसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. स्मार्टफोनबद्दल (Smartphone) बोलायचे झाल्यास ग्राहकांना अतिशय वाजवी दरात स्मार्टफोनची खरेदी करता येणार आहे. फोनवर विविध ऑफर्स उपलब्ध ​​आहेत. रेडमी 9 ॲक्टिव्ह (Redmi 9 Active) या स्मार्टफोनवरही मोठ्या प्रमाणात ऑफर देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन युजर्स केवळ 500 रुपयांपेक्षाही कमी किमतीत खरेदी करू शकणार आहेत. जर तुम्हीही एखादी बजेट फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. या फोनवर डिस्काउंट (Discount) फक्त दोन दिवसांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय अनेक स्वस्त फोनवर मेगा डिस्काउंट देण्यात येत आहे.

किंमत आणि ऑफर

Redmi 9 Active या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन 10,999 रुपयांऐवजी 8,799 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या फोनला ॲमेझॉनवर 5 पैकी 4.2 रेटींग देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन 414 रुपयांच्या इएमआयवर देखील खरेदी केला जाऊ शकतो. यावर काही बँक ऑफर देखील दिल्या जात आहेत, ज्यात एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्के सूट दिली जात आहे. जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर 8,350 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर तुम्हाला तुमच्या फोनची संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली तर तुम्हाला हा फोन फक्त 449 रुपयांमध्ये मिळेल.

Redmi 9 Active ची फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 720×1600 च्या पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.53 इंचाचा एचडी प्लस डिसप्ले देण्यात आला आहे. त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. हा फोन ऑक्टा-कोर Helio G35 प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याचा वॉच स्पीड 2.3 GHz पर्यंत आहे. फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेंसर 13 मेगापिक्सेल आणि दुसरा 2 मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे जी 10 W वायर्ड चार्जरला सपोर्ट करते. यात 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते.