
ग्राहकांची प्रतीक्षा संपवत रेडमीने परवडणाऱ्या किमतीत मोठी बॅटरी आणि मोठी स्क्रीन असलेला Redmi 15C 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्सवर व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या परवडणाऱ्या फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंगसह काही फिचर्स देखील आहेत. चला तर रेडमीच्या या स्मार्टफोनची किंमत आणि अनोखे फिचर्स जाणून घेऊयात.
रेडमी स्मार्टफोनच्या 4 जीबी/128 जीबी बेस व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये, तर 6 जीबी/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आणि टॉप 8 जीबी/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 15,499 रुपये आहे. त्यातच या फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 11 डिसेंबर रोजी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, Mi.com, तसेच Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा फोन मिडनाइट ब्लॅक, मूनलाईट ब्लू आणि डस्क पर्पल या तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
या किंमतीच्या रेंजमध्ये रेडमी कंपनीचा हा नवीनतम फोन Oppo K13x 5G, Poco M7 Pro 5G, Realme P3 Lite 5G, Vivo T4 Lite 5G सारख्या बजेट स्मार्टफोन्सना कडक टक्कर देणार आहे.