सावधान! तुमच्या फोनमधील ‘हे’ 8 अ‍ॅप्स ताबडतोब डिलीट करा, Google कडूनही बॅन

| Updated on: Aug 22, 2021 | 4:55 PM

गेल्या काही महिन्यांपासून लोक क्रिप्टोकरन्सीमध्ये खूप रस दाखवत आहेत, तर हॅकर्स त्याचा गैरफायदा घेऊन लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सावधान! तुमच्या फोनमधील हे 8 अ‍ॅप्स ताबडतोब डिलीट करा, Google कडूनही बॅन
Google Play Store
Follow us on

मुंबई : गेल्या काही महिन्यांत, लोक क्रिप्टोकरन्सीमध्ये खूप रस दाखवत आहेत आणि लोक त्यावर खूप चर्चादेखील करत आहेत. एकीकडे लोक क्रिप्टो करन्सीमध्ये खूप रस घेत आहेत, तर हॅकर्स त्याचा गैरफायदा घेऊन लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी, ते वापरकर्त्यांना धोकादायक मालवेअर आणि अ‍ॅडवेअर असलेले मॅलिशियस अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्यास सांगतात आणि ते इन्स्टॉल करताच वापरकर्त्यांचा डेटा हॅक होतो. पण गुगलने असे अनेक अ‍ॅप्स ओळखले आणि त्यांना प्ले स्टोअरमधून काढून टाकले आहेत. (Remove these 8 apps from your phone otherwise you will loose your data and money, Also Banned by Google)

गुगलने प्ले स्टोअरमधून एकूण 8 धोकादायक अ‍ॅप्स काढून टाकले आहेत, जे क्रिप्टोकरन्सी मायनिंग अ‍ॅप्स म्हणून सादर करण्यात आले होते. यामध्ये, वापरकर्त्यांना गुंतवणुकीवर मोठा नफा मिळत असल्याचे सांगितले जात होते. सिक्युरिटी फर्म ट्रेंड मायक्रोने आपल्या विश्लेषणाच्या आधारे दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, हे 8 मॅलिशियस अ‍ॅप्स जाहिरातींच्या बहाण्याने लोकांना फसवत होते, सब्सक्रिप्शन सर्विसेजसाठी पैसे देत होते ज्यांचे सरासरी मासिक शुल्क $ 15 (जवळपास 1115 रुपये) होते.

ट्रेंड मायक्रोने गुगल प्लेला याबाबत माहिती दिली आणि गुगलने ते अ‍ॅप्स लगेच काढून टाकले. यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की, जरी गुगलने हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरमधून काढून टाकले असतील, पण हे अ‍ॅप अजूनही तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केलेले असू शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही हे अ‍ॅप्स इंस्टॉल केले असतील, तर ते त्वरित डिलीट करण्याची गरज आहे. अन्यथा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, किंवा तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो.

हे आहेत धोकादायक अ‍ॅप्स

  • BitFunds – Crypto Cloud Mining
  • Bitcoin Miner – Cloud Mining
  • Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet
  • Crypto Holic – Bitcoin Cloud Mining
  • Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System
  • Bitcoin 2021
  • MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner
  • Ethereum (ETH) – Pool Mining Cloud

इतर बातम्या

आता iOS वापरकर्तेही खेळू शकतात बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया, डाऊनलोडसाठी गेम उपलब्ध

भारतात 5G ची मारामार, तिकडे LG कडून 6G टेस्टिंग, डेटा ट्रान्समिशन प्रक्रिया यशस्वीपणे पार

रिअलमीने लाँच केले रिअलमी जीटी स्मार्टफोन आणि स्लिम बुक लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Remove these 8 apps from your phone otherwise you will loose your data and money, Also Banned by Google)