Super Earth: वैज्ञानिकांना लागला दुसऱ्या पृथ्वीचा शोध?, 70 टक्के मोठा आणि पाचपट वजनदार ग्रह सापडला, ग्रहावर खोल समुद्रही

| Updated on: Aug 26, 2022 | 7:01 PM

कॅनडाच्या मॉन्ट्रियल युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, हा नवा ग्रह पृथ्वीपेक्षा 70 टक्के मोठा आणि पृथ्वीपेक्षा पाच पट मोठा आहे. या ग्रहावर दगड धोंडेही आहेत. त्यामुळे याला सुपर अर्थ असेही संबोधण्यात येते आहे. या ग्रहावर असलेला समुद्र हा एकूण ग्रहाच्या 30 टक्के आहे.

Super Earth: वैज्ञानिकांना लागला दुसऱ्या पृथ्वीचा शोध?, 70 टक्के मोठा आणि पाचपट वजनदार ग्रह सापडला, ग्रहावर खोल समुद्रही
पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह
Image Credit source: social media
Follow us on

टोरंटो- अंतराळ संशोधकांच्या (Astronauts)एका आतंरराष्ट्रीय टीमने पृथ्वीपासून 100 प्रकाश वर्ष दूरवर असलेला एक नवा ग्रह ( new planet)शोधला आहे. या ग्रहाचे नाव TOI-1452b असे ठेवण्यात आले आहे. हा ग्रह आपल्या सूर्यमंडळाच्या कक्षेच्या बाहेर असलेला ग्रह आहे. हा ग्रह दोन ताऱ्यांची परिक्रमा करतो. आश्चर्याची बाब म्हणजे या ग्रहावर खोल समुद्र (deep ocean)असल्याचा शोधही संशोधकांना लागलेला आहे. याच कारणामुळे त्याला ओशियन प्लॅनेट, समुद्र असलेला ग्रह म्हणूनही संबोधण्यात येते आहे.

पृथ्वीपेक्षा 70 टक्के मोठा ग्रह

कॅनडाच्या मॉन्ट्रियल युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, हा नवा ग्रह पृथ्वीपेक्षा 70 टक्के मोठा आणि पृथ्वीपेक्षा पाच पट मोठा आहे. या ग्रहावर दगड धोंडेही आहेत. त्यामुळे याला सुपर अर्थ असेही संबोधण्यात येते आहे. या ग्रहावर असलेला समुद्र हा एकूण ग्रहाच्या 30 टक्के आहे. पृथ्वीची तुलना केली तर पृथ्वीवर 70 टक्के समुद्र आहे. मात्र द्रव्यमानाचा विचार केल्यास हा समुद्र पृथ्वीच्या केवळ 1 टक्के इतकाच आहे.

या ग्रहावर पाण्याचा जाड थर

संशोधकांच्या अभ्यासानुसार हा ग्रह त्याच्या ताऱ्यांपासून दूर अंतरावर आहे. त्यामुळे त्याचे तापमान जास्त गरम किंवा थंड नसते. त्यामुळे तिथे द्रव्य स्वरुपात पाणी मिळण्याची शक्यता आहे. अंतराळ संशोधकांचा दावा आहे की, या ग्रहावर पाण्याचा एक जाड थर असण्याची शक्यता आहे. असाच पाण्याचा थर हा बृहस्पती आणि शनी या ग्रहांवरही असण्याची शक्यता आहे.

जेम्स वेब टेलिस्कोपनी होणार संशोधन

सध्या या एक्सोप्लॅनेटचा शोध नासाच्या ट्राजिटिंग एक्सोप्लॅनेट सर्वे सॅटेलाईटच्या (TESS)स्पेस टेलिस्कोपच्या माध्यमातून करण्यात येतो आहे. मात्र या संशोधनात सामील असलेले प्राध्यापक रेने डोयोन यांचा दावा आहे की, जगातील सर्वात शक्तिशाली असलेल्या जेम्स वेब टेलिस्कोपची या संशोधनात अधिक मदत होऊ शकते. TOI-1452b या ग्रहावरील अद्भुत जग अधिक समजून घेण्यासाठी संशोधक, वैज्ञानिक लवकरच जेम्स वेब टेलिस्कोपची वेळ घेणार आहेत.

यापूर्वीही शोधला होता असा एक ग्रह

यापूर्वीही ऑगस्टच्या सुरुवातीला करण्यात आलेल्या एका संशोधनात एका एक्सोप्लॅनेटचा शोध लावण्यात आला होता. त्या ग्रहावरील द्रव्यमान हे पृथ्वीपेक्षा 4 पट अधिक आहे. हा ग्रह आकाशगंगेच्या बाहरेच्या परिसरात अस्तित्वात आहे. वैज्ञानिकांनी या ग्रहाचे नाव ‘रॉस 508 बी’ असे ठेवण्यात आलेले आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 37 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. या ग्रहावरील एक वर्ष 11 दिवसांइतके आहे.