आता ऊर्जा क्षेत्रात होणार क्रांती, शास्रज्ञांनी नव्या सुपरकंडक्टरचा शोध लावला

संशोधकांनी एका नव्या सुपरकंडक्टरचा शोध लावला आहे. जो कोणत्याही पारंपारिक धातूपेक्षा अधिक वेगाने वीजेचे वहन करील.

आता ऊर्जा क्षेत्रात होणार क्रांती, शास्रज्ञांनी नव्या सुपरकंडक्टरचा शोध लावला
superconducter
Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 04, 2023 | 9:51 PM

मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : विज्ञानात रोज नवनवीन क्रांतीकारी बदल होत आहेत. नवीन शोधामुळे मानवाचे जीवन सोयीचे होत आहे. मानव आपल्याला आणखी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी हायटेक तंत्रज्ञान वापरीत आहे. या दरम्यान ऊर्जेची गरज कायम लागणार आहे. ऊर्जेशिवाय विकास होऊ शकत नाही. त्यामुळे सौर्य ऊर्जा, विद्युत ऊर्जा आणि अणू ऊर्जा याला पर्याय शोधले जात आहेत. अशात शास्रज्ञांनी एका अशा सुपरकंडक्टरचा शोध लावला आहे जो ऊर्जा आणि इलेक्ट्ऱ़ॉनिक क्षेत्रात क्रांतीकारी ठरणार आहे. पाहूयात कोणता शोध शास्रज्ञांनी लावला आहे.

संशोधकांनी एका नव्या सुपरकंडक्टरचा शोध लावला आहे. जो कोणत्याही पारंपारिक धातूपेक्षा अधिक वेगाने वीजेचे वहन करील. भविष्यात वीजेचे वहन वेगाने होणार आहे. न्यूयॉर्कच्या युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टरचे प्रोफेसर रंगा डीयास आणि त्यांच्या टीमने दावा केला आहे की त्यांनी एक असा पदार्थ बनविला आहे. केवळ 20 डीग्री सेल्सियस तापमानात हा नवा सुपरकंडक्टर तयार होऊ शकतो असे शास्रज्ञांनी म्हटले आहे.

कमी दाबात करणार काम

या सुपरकंडक्टरला तयार करण्यासाठी हायड्रोजन, नायट्रोजन आणि ल्यूटेटियमचे मिश्रण केले आहे. या पदार्थासाठी ठराविक तापमानावर एक गीगापास्कलच्या दबावाची गरज असते. हा पदार्थ आजच्या काळासाठी क्रांतीकारक ठरु शकतो. त्या भविष्यातील योजनासाठी तयार करण्यात आले आहे.

याचा फायदा काय होणार ?

या सुपरकंडक्टरचा मानवासाठी खूपच लाभ होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा स्थानांतरण, वितरण आणि अन्य मोठ्या कामासाठी या सुपरकंडक्टरचा वापर होणार आहे. या सुपरकंडक्टरमुळे वीजेच्या वहनात कोणताही व्यत्यय होणार नाही. यामुळे कमीत कमी 20 कोटी मेगावॅटच्या वीजेची बचत होईल. त्याशिवाय वैद्यक क्षेत्रात त्याचा जादा वापर होईल. एमआरए आणि मॅग्नेटोकार्डीयोग्राफी उदा. इमेजिंग आणि स्कॅनिंग तंत्र पहिल्यापेक्षा अधिक प्रगत होणार आहे.