स्मार्टफोनवरील ‘हे’ व्हिडिओ बघणं आजच बंद करा… तुमच्यावर कुणाची तरी नजर आहे…

भारतामध्ये अडल्ट कंटेंटवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. परंतु असे असले तरीही लपूनछपून असा कंटेंट पाहणाऱ्यांची संख्याही भारतात कमी नाही. परंतु आता तुमची हीच सवय तुम्हाला महागात पडू शकते.

स्मार्टफोनवरील ‘हे’ व्हिडिओ बघणं आजच बंद करा… तुमच्यावर कुणाची तरी नजर आहे…
ईएमआयवर स्मार्टफोन खरेदी केला म्हणून पती-पत्नीत वाद
| Edited By: | Updated on: Sep 10, 2022 | 4:35 PM

आजकाल असा एकही व्यक्ती दिसणार नाही ज्याकडे स्मार्टफोन (Smartphone) नसेल. संपूर्ण जग आज मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर करीत आहे. पूर्वी फोनचा वापर केवळ संवादासाठी होत असला तरी आता हाच स्मार्टफोन इंटरटेनमेंटचे मोठे माध्यम बनला आहे. प्रत्येक जण यात आपले डिजिटल काम सहज करू शकता. व्हिडिओ पाहण्यासह अनेक गोष्टींसाठी लोक मोठ्या संख्येने स्मार्टफोनचा वापर करताना दिसून येत आहे. अनेक लोक अडल्ट कंटेंट (Adult Content) पाहण्यासाठी याचा वापर करतात. भारतात या प्रकारच्या कंटेंटवर पूर्णपणे बंदी (Ban) आहे, परंतु तरीही अनेक लोक गुपचूप असे कंटेंट बघत असतात.

अशा लोकांना माहित नाही, की एआय बॉट्स (AI Bots) अशा कंटेंटकडे लक्ष ठेवून आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच 4 गोष्टींबद्दल माहिती देत आहोत, जे तुम्‍ही तुमच्‍या फोनवर अॅडल्ट कंटेंट पाहिल्‍यास तुम्‍हाला अडचणीत आणू शकते.

1) पेड कंटेंट पाहणे : असे बरेच लोक आहेत जे असे कंटेंट पाहण्यासाठी पैसे मोजण्यासही तयार असतात. पण हा सर्वात मोठा धोका आहे. कारण याच्या मदतीने तुम्हाला संबंधित कंटेंट देणारी व्यक्ती तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर सहजपणे टाकू शकते त्याव्दारे तुमची सर्व माहिती चोरीलाही जावू शकते. बँक खाते रिकामे केले जाऊ शकते.

2) ब्राउझिंग हिस्ट्री : आपण नेटवर काय ब्राउझ करत आहोत याची संपूर्ण माहिती गुगलला असते. तुम्ही अडल्ट कंटेंट बघत असल्यास तुमच्या ब्राउझिंग पॅटर्नवर आधारित तुम्हाला डिझाईन केलेल्या जाहिराती दाखवल्या जातात. तुमच्या सोशल मीडियावरही बारकाईने लक्ष ठेवले जाते आणि त्या आधारे तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात.

3) फाइल्स डाऊनलोड करणे : अनेक वेळा लोक पॉर्न वेबसाइटवरून अशा प्रकारची फाइल डाउनलोड करतात आणि त्या फाइलसोबत जाणूनबुजून किंवा नकळत मालवेअर डाउनलोड केले जातात. याद्वारे तुमचे वैयक्तिक फोटो चोरले जातात आणि तुम्हाला ब्लॅकमेल केले जाऊ शकते.

4) इंटेलिजेंस एजन्सी : जर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये अडल्ट कंटेंट दिसला, तर इंटेलिजेंस एजन्सीही तुमच्यावर लक्ष ठेवून असते. आपल्या सोशल मीडिया खात्यावरही बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असते.

दरम्यान, जर तुम्ही पॉर्न साइटवर गेलात आणि तिथून फाइल डाउनलोड केली तर तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर टाकला जाऊ शकतो. हा मालवेअर तुमची हेरगिरी करू लागतो. तसेच तुमच्या खासगी फोटोंबद्दल तुम्हाला ब्लॅकमेलही केले जावू शकते.