2019 मध्ये लाँच होणार सात सीटर ‘Tata H7x’

नवी दिल्ली : Tata Motors ची बहुप्रतीक्षित एसयूव्ही Tata Harrier येत्या 23 जानेवारीला भारतामध्ये लाँच होणार आहे. या सोबतच Tata H7x हॅरियरची सात सीटर कारही लवकरच भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. ही कार कधी लाँच होणार याची माहिती अजून समोर आली नसली तरी याच वर्षात ही सात सीटर कार […]

2019 मध्ये लाँच होणार सात सीटर Tata H7x
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

नवी दिल्ली : Tata Motors ची बहुप्रतीक्षित एसयूव्ही Tata Harrier येत्या 23 जानेवारीला भारतामध्ये लाँच होणार आहे. या सोबतच Tata H7x हॅरियरची सात सीटर कारही लवकरच भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. ही कार कधी लाँच होणार याची माहिती अजून समोर आली नसली तरी याच वर्षात ही सात सीटर कार लाँच होणार आहे असल्याचं सांगितलं जात आहे.

 

कंपनीने सांगितले आहे की, हॅरियरची सात सीटर व्हर्जन कार 2019 वर्षात लाँच केली जाणार आहे. या सात सीटर एसयूव्हीला कंपनी दुसऱ्या नावाने बाजारात उतरवणार आहे. टाटा हॅरियरच्या पाच सीटर व्हर्जन प्रमाणेच सात सीटर व्हर्जन लँड रोव्हरच्या D8 च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.

 

ही एसयूव्ही टाटा हॅरियरपेक्षा थोडी मोठी असेल, पण दोघांचा व्हिलबेस समान आहे. नवीन एसयूव्हीमध्ये 2.0 लीटर क्रायटेक डिझल इंजिन असेल, पण याची पॉवर पाच सीटर हॅरियरपेक्षा जास्त असेल. या कारचे इंजिन 170hp पॉवर 350nm टॉर्क जनरेट करते.

मोठ्या एसयूव्हीमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळणार आहे. या एसयूव्हीची किंमत 25 लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किंमतीनुसार ही टाटाची प्रीमियम एसयूव्ही असेल.