Vivo : विवोचे 6 स्मार्टफोन 4000 रुपयांनी महाग, जाणून घ्या किंमत

तुम्ही जर विवो स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कंपनीने अनेक मॉडेल्सच्या किमती 4000 रूपयांपर्यंत वाढवल्या आहेत. मोबाईलच्या वाढत्या घटकांच्या किमती आणि पुरवठाच्या दबावामुळे ही दरवाढ 21 एप्रिलपासून लागू झाली आहे.

Vivo : विवोचे 6 स्मार्टफोन 4000 रुपयांनी महाग, जाणून घ्या किंमत
Vivo Smartphone
Image Credit source: Vivo
| Edited By: | Updated on: Apr 24, 2026 | 7:20 AM

तुम्ही जर विवो स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात, कारण कंपनीने अनेक स्मार्टफोन मॉडल्सच्या किमती 4 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला आता विवो कंपनीचे हे काही फोन खरेदी करणे खूप महागात पडू शकतात. त्यात एका टिपस्टरने सांगितले की, हा बदल इंडस्ट्रीमधील एका मोठ्या ट्रेंडचा भाग आहे, ज्यात इतर स्मार्टफोन ब्रँड्सनी सुद्धा गेल्या काही आठवड्यांत अशाच प्रकारची दरवाढ केली आहे. कंपनीने अधिकृतपणे याचे कारण सांगितले नसले तरी असे बदल अनेकदा वाढत्या घटकांच्या किमती, चलनातील चढ-उतार आणि पुरवठा साखळीवरील दबावाशी संबंधित असतात, ज्याचा परिणाम ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स विभागातील किंमत धोरणांवर होतो. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की विवो कंपनीने कोणत्या स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत.

टिपस्टर यांच्या पोस्टनुसार फोनच्या वाढत्या किमती 21 एप्रिलपासून लागू झाल्या असून अनेक मॉडेल्सच्या किमतीत 1 हजार ते 4 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. नवीन किमती विवो इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवरही दिसत आहेत.

भारतात विवो टी5एक्सची किंमत

या विवो स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिएंटच्या किमतीत 4,000 ने वाढ करण्यात आली आहे. 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत आता 18 हजार 999 रूपयांवरून 22 हजार 999 रूपये झाली आहे, तर 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 24 हजार 999 रूपये आणि 8GB/256GB व्हेरिएंटची किंमत 26 हजार 999 रूपये झाली आहे.

भारतात Vivo V70 Elite ची किंमत

या विवो मोबाईलचा 8GB/256GB व्हेरिएंट 51 हजार 999 रुपयांऐवजी 55 हजार 999 रुपयांना विकला जाईल, तर 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत 56 हजार 999 रुपयांवरून 59 हजार 999 रुपयांपर्यंत वाढली आहे.

भारतात विवो व्ही70 ची किंमत

या विवो फोनच्या किंमतीतही 4 हजार रुपयांची वाढ झाली असून, 8जीबी/256जीबी व्हेरिएंटची किंमत 45 हजार 999 रुपयांवरून 49 हजार 999 रुपये झाली आहे, तर 12जीबी/256 जीबी मॉडेल आता 49 हजार 999 रुपयांऐवजी 53 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

भारतात विवो Y400 ची किंमत

या विवो फोनचा 8GB/128GB व्हेरिएंट आता 25 हजार 999 रुपयांऐवजी 28 हजार 999 रुपयांना विकला जात आहे, तसेच 8GB/256GB व्हेरिएंटची किंमत देखील 27 हजार 999 रुपयांवरून 31 हजार 999 रुपयांपर्यंत वाढली आहे.

भारतात विवो Y51 प्रो ची किंमत

या विवो स्मार्टफोनचा 8GB/128GB व्हेरिएंट 24 हजार 999 रुपयांऐवजी 27 हजार 999 रुपयांना, तर 8GB रॅम/256GB व्हेरिएंट 27 हजार 999 रुपयांऐवजी 30 हजार 999 रुपयांना विकला जात आहे.

भारतातील विवो Y31 5G ची किंमत

हा विवो 5G स्मार्टफोन आता महाग झाला असून, 4GB रॅम/128GB व्हेरिएंटची किंमत 18 हजार 999 रूपयांऐवजी 19 हजार 999 झाली आहे. 6GB रॅम/128GB व्हेरिएंट आता 20 हजार 999 ऐवजी 23 हजार 999 मध्ये उपलब्ध आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us