
नॉईज कंपनीने भारतात त्यांच्या प्रीमियम ऑडिओ लाइनअपमध्ये एअरवेव्ह मॅक्स 6, एअरवेव्ह मॅक्स 5 ची अपग्रेडेड आवृत्ती लाँच केली आहे. हे हेडफोन्स डीप बास, बॅलेंस्ड हाई, मिड आणि लो साठी कोएक्सियल ड्युअल ड्रायव्हर सिस्टम आणि स्पष्ट आवाज ऐकायला मिळत आहे. चला या हेडफोन्सची इतर प्रमुख वैशिष्ट्ये, त्यांची किंमत आणि उपलब्धता तसेच रंग पर्याय याबद्दल जाणून घेऊयात.
म्युजिक, चित्रपट, गेमिंग आणि व्हर्च्युअल मीटिंग दरम्यान डिटेल्स आणि समृद्ध आवाजासाठी LDAC सपोर्ट देण्यात आला आहे. रिअल-टाइम अॅम्बियंट नॉइज रिडक्शनसाठी स्मार्ट अॅडॉप्टिव्ह हायब्रिड ANC सपोर्ट आहे. कॉल दरम्यान स्पष्ट आवाजासाठी विंड-नॉइज कॅन्सलेशनसह पाच मायक्रोफोन उपलब्ध आहेत. वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन 6 सपोर्ट आहे.
या हेडफोन्सच्या बॅटरी लाइफबद्दल बोलायचे झाले तर, नॉईजचे नवीनतम हेडफोन्स, एअरवेव्ह मॅक्स 6, उत्कृष्ट बॅटरी लाइफ देतात. तुम्हाला सामान्य मोडमध्ये 120 तासांपर्यंत प्लेबॅक देतात आणि ANC सक्षम असताना 80 तासांपर्यंत प्लेबॅक देतात. 10 मिनिटांचा क्विक चार्ज 15 तासांपर्यंत ऐकण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. हेडफोन्सची एर्गोनॉमिक डिझाइन दीर्घकालीन वापरासाठी आदर्श आहे. 10 मिनिटे 15 तासांपर्यंत प्लेबॅक सपोर्ट मिळत आहे.
नॉइज एअरवेव्ह मॅक्स 6 ची भारतातील किंमत
हे प्रीमियम हेडफोन्स एक वर्षाची वॉरंटीसह येतात. ड्यून व्हाइट, कोबाल्ट ब्लू, फॉरेस्ट ग्रीन आणि कार्बन ब्लॅक रंगात उपलब्ध असलेले हे हेडफोन्स 6 हजार 999 रूपयांच्या किंमतीमध्ये उपलब्ध आहेत. तसेच हे हेडफोन्स कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून तसेच Amazon आणि Flipkart वरून खरेदी करता येतील. या किंमतीच्या रेंजमध्ये हे हेडफोन्स साउंडकोर, फिलिप्स, CMF, पॅनासोनिक आणि सेन्हाइझर सारख्या प्रमुख ब्रँडच्या प्रीमियम-फीचर्ड हेडफोन्सशी स्पर्धा करतात.