
iQOO 15R हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 1.5K रिझोल्यूशन, 144Hz AMOLED स्क्रीन, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, 50-मेगापिक्सेल सोनी सेन्सर आणि 7600mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. या फोनची किंमत किती आहे, तसेच या फोनची विक्री कधी सुरू होईल, फोनसोबत कोणते ऑफर्स उपलब्ध आहेत आणि फोनमध्ये कोणते फीचर्स असतील ते जाणून घेऊयात.
या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 44 हजार 999 रुपये आहे. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 47 हजार 999 रुपये आहे. तुम्हाला जर 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट हवा असेल तर तो तुम्हाला 52 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या किंमतीच्या रेंजमध्ये हा फोन वनप्लस, सॅमसंग आणि अॅपल सारख्या ब्रँडच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर फोनची विक्री 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. Amazon आणि iQOO इंडिया स्टोअरवर प्री-बुकिंग आधीच सुरू झाली आहे आणि प्री-बुकिंग केलेल्या ग्राहकांसाठी विक्री 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
स्क्रीन: फोनमध्ये 6.59-इंचाची AMOLED स्क्रीन आहे जी 120Hz रिफ्रेश रेट, 5000 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते.
बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी एक पॉवरफूल 7600 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 100 वॅट वायर्ड आणि बायपास चार्जिंगला सपोर्ट करते.
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 8 जनरल 5 प्रोसेसर देण्यात आला आहे, तसेच चांगल्या ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 826 जीपीयू वापरण्यात आला आहे.
कॅमेरा: फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा सोनी LYT-700V प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि मागील बाजूस 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आहे. सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.