चार्जिंगची कटकटच नाही, आता आठवडाभर चालेल फोन, मोटोरोलाचा हा स्वस्त 7000mAh बॅटरीचा फोन पाहिलात का?

मोटोरोलाने 15 हजार ते 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन फोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी Moto G37 Power हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 7000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि मीडियाटेक प्रोसेसर आहे. चला जाणून घेऊया की हा फोन विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल.

चार्जिंगची कटकटच नाही, आता आठवडाभर चालेल फोन, मोटोरोलाचा हा स्वस्त 7000mAh बॅटरीचा फोन पाहिलात का?
Moto G37 Power
| Edited By: | Updated on: May 21, 2026 | 3:47 PM

सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन लाँच होत आहेत. एकीकडे भारतीय बाजारांमध्ये स्मार्टफोनच्या किमतीत वाढ होताना दिसत आहेत तर दुसरीकडे मोटोरोला कंपनीने ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन योग्य दरात उत्तम स्मार्टफोन सादर केले आहेत. अशातच मोटोरोलाने ग्राहकांसाठी Moto G37 Power हा फोन लाँच केला आहे. हा फोन 15 हजार ते 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये फोन शोधणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करतो. या डिव्हाइसच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात मीडियाटेक प्रोसेसर, 7000mAh बॅटरी आणि 50-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे. चला जाणून घेऊया की या फोनची विक्री कधी सुरू होईल आणि तुम्हाला फोनमध्ये कोणती फिचर्स मिळतील.

भारतात Moto G37 Power ची किंमत

या नवीन मोटोरोला स्मार्टफोनची किंमत 4GB रॅम/128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 15 हजार 999 रूपये आणि 8GB रॅम/128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 18 हजार 999 रूपये आहे. याची विक्री 25 मे पासून सुरू होईल. कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त हा फोन फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असेल. या किंमत श्रेणीमध्ये हा मोटोरोला फोन Redmi 15 5G, Poco M7 Plus 5G, Redmi Note 14 SE 5G आणि Oppo K14x 5G सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करतो.

Moto G37 Power स्पेसिफिकेशन्स

ऑपरेटिंग सिस्टम: हा नवीनतम ड्युअल-सिम मोटोरोला मोबाईल Android 16 वर चालतो.

स्क्रीन: या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 120Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1050 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेससह 6.6-इंचाचा HD+ LCD स्क्रीन आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 7i वापरला जातो.

चिपसेट: या हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा फोन 4GB आणि 8GB व्हेरिएंटमध्ये येतो, परंतु 4GB व्हर्च्युअल रॅमसह, 4GB व्हेरिएंट 8GB पर्यंत रॅमला सपोर्ट करेल आणि 8GB व्हेरिएंट 12GB पर्यंत रॅमला सपोर्ट करेल. फोटो व्हिडिओ आणि इतर कंटेंटसाठी 128GB स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा: 8-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासोबतच, फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2-इन-1 लाईट सेन्सर आहे.

कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.4, 5G, Wi-Fi 5, GPS, 4G LTE, 3.5mm हेडफोन जॅक, A-GPS आणि USB टाइप-C पोर्ट आहेत.

Follow Us