80 वॉट फास्ट चार्जिंग, VC कूलिंग सिस्टीम असलेला ‘हा’ फोन लाँच, जाणून घ्या किंमत
वनप्लस नॉर्ड सीई ६ भारतात लॉन्च झाला आहे. हा मिड-रेंज फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसह येतो. याची सुरुवातीची किंमत किती आहे, हा फोन विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल. चला जाणून घेऊयात.

वनप्लस कंपनीने भारतात त्यांच्या नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. ज्याचे नाव वनप्लस नॉर्ड सीई 6 ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. तर या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7-सिरीज प्रोसेसर आणि ड्युअल रियर कॅमेरा सिस्टीम आहे. त्याचबरोबर यामध्ये काही प्रभावी वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग आजच्या या मिड-रेंज फोनची किंमत आणि त्याच्या उपलब्धतेबद्दल जाणून घेऊयात.
भारतात वनप्लस नॉर्ड सीई 6 ची किंमत
भारतात या नवीन मिड-रेंज फोनची किंमत 8GB/128GB व्हेरिएंटसाठी 29 हजार 999 रूपये आणि 8GB/256GB व्हेरिएंटसाठी 32 हजार 999 रूपये आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 2 हजार रूपयांपर्यंत सूट देखील मिळेल. या फोनची विक्री 8 मे रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा फोन तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवर आणि ॲमेझॉन वरून खरेदी करता येईल.
या फोनच्या स्पर्धेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या किंमत श्रेणीमध्ये हा हँडसेट realme GT 7T, vivo T5 Pro 5G, Samsung Galaxy A36 5G आणि OPPO K13 Turbo Pro 5G सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.
वनप्लस नॉर्ड सीई 6 वैशिष्ट्ये
ओएस: हा ड्युअल सिम फोन अँड्रॉइड 16 वर आधारित OxygenOS 16 वर चालतो.
डिस्प्ले: या फोनमध्ये 6.78-इंचाचा 1.5K रिझोल्यूशनचा AMOLED डिस्प्ले असून, त्याची कमाल ब्राइटनेस 3600 nits पर्यंत, रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत आणि टच सॅम्पलिंग रेट 3200Hz पर्यंत आहे. तसेच, हा फोन धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटेड आहे.
कॅमेरा: ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनमध्ये 50MP चा OmniVision OV50D40 प्रायमरी कॅमेरा आणि 10x पर्यंत डिजिटल झूम असलेला 2MP चा सेकंडरी सेन्सर आहे. यामध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे, जो 30fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी या नवीन विवो फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर असून उत्कृष्ट ग्राफिक्ससाठी ॲड्रेनो 810 GPU दिला आहे. डिव्हाइसला थंड ठेवण्यासाठी यात VC कूलिंग सिस्टीमदेखील आहे.
बॅटरी: या फोनमध्ये 8000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंग आणि 27W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.