मोठ्या सवलतीत खरेदी करा सॅमसंगचा ‘हा’ पॉवरफूल कॅमेरा असलेला स्मार्टफोन, जाणून घ्या त्याचे जबरदस्त फिचर्स

यंदाच्या दिवाळीत तुम्हाला जर फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही एक उत्तम संधी आहे, कारण अमेझॉनच्या दिवाळी सेलमध्ये सॅमसंग झेड फोल्ड 6 या स्मार्टफोन मोठी सुट दिली जात आहे. चला तर मग मोठ्या सवलतीत तुम्हाला हा फोन कोणत्या किंमती खरेदी करता येणार आहे जाणून घेऊयात.

मोठ्या सवलतीत खरेदी करा सॅमसंगचा हा पॉवरफूल कॅमेरा असलेला स्मार्टफोन,  जाणून घ्या त्याचे जबरदस्त फिचर्स
| Edited By: | Updated on: Nov 01, 2025 | 6:29 PM

तुम्ही जर कमी किमतीत पॉवरफूल कॅमेरा असलेला फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दिवाळी सेल ही एक उत्तम संधी आहे. Amazon वर सुरू असलेल्या दिवाळी सेल मध्ये तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 6 हा स्मार्टफोन 60,000 रूपयांपर्यंतच्या मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. या फोनमध्ये मोठा 7-इंच डिस्प्ले आणि पाच कॅमेरे यांसारखे प्रभावी फिचर्स आहेत. चला या डीलबद्दल अधिक जाणून घेऊयात…

Samsung Galaxy Z Fold 6: किती रूपयांची सूट आहे?

सॅमसंग कंपनीचा हा फोन 1,64,999 रूपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झाला होता. मात्र आता हा स्मार्टफोन Amazon दिवाळी सेल मध्ये तुम्हाला 1,03,999 रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे, म्हणजेच हा फोन तुम्हाला 61,000 रूपयांची मोठी सवलत दिली जात आहे. याशिवाय तुम्हाला Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून 3,119 रूपयांची अतिरिक्त सुट तसेच Amazon Pay कॅशबॅक बॅलन्स देखील मिळू शकते. हा फोन नो-कॉस्ट EMI पर्यायांसह देखील उपलब्ध केला आहे. त्याचबरोबर तुम्ही हा फोन सिल्व्हर शॅडो आणि नेव्ही रंगांमध्ये खरेदी करू शकतात.

Samsung Galaxy Z Fold 6 चे फिचर्स

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 6 हा एक प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन आहे जो परफॉर्मन्स आणि मल्टीटास्किंगसाठी डिझाइन केलेला आहे. तर हा फोन लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेटद्वारे समर्थित, Galaxy Z Fold 6 Android 14 वर चालतो आणि सॅमसंगने सात प्रमुख अँड्रॉइड अपडेट्सचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे फोन भविष्यात तांत्रिकदृष्ट्या अपडेट राहील.

फोनमध्ये दोन डिस्प्ले आहेत, एक 7.0-इंच अंतर्गत डिस्प्ले आणि 6.3-इंच कव्हर डिस्प्ले. दोन्हीमध्ये LTPO डायनॅमिक AMOLED 2X तंत्रज्ञान आहे. या फोन मध्ये डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600निट्स पीक ब्राइटनेस देतात. प्रोटेक्शनगोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ वापरला जातो.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर (OIS सह), 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, डिव्हाइसमध्ये 4 मेगापिक्सेलचा अंडर-डिस्प्ले कॅमेरा आणि 10 मेगापिक्सेलचा फ्रंट कव्हर कॅमेरा आहे. फोनमध्ये 25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4400 एमएएच बॅटरी आहे, जी क्विक चार्जिंग आणि दीर्घ बॅटरी लाइफ सुनिश्चित करते.